जाहिराती विभाग:

 

नमस्कार आदरणीय वाचक,  जाहिरातदार

 

सर्वप्रथम आपण चेकमेट पब्लिकेशन्स अॅड पब्लिसिटीच्या चेकमेट टाईम्सच्या या ऑनलाईन न्यूज पोर्टलला भेट दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार...!

 

चेकमेट टाईम्सहे डिजिटल इंडिया संकल्पनेतील महाराष्ट्रातील पहिले ऑनलाईन न्यूज पोर्टल असून, ते आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यानंद झाला आहे. व्यवसाय नाही, सेवा म्हणून सुरु केलेले हे न्यूज पोर्टल प्रामुख्याने पुणे शहर / जिल्हा यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक ताज्या घडामोडीसह, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या, लोकांची गरज असलेल्या, वाचकांची मागणी असलेल्या, मोठ्या समस्येपासून लहानात लहान समस्येसह, तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या, त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी सुरु केले आहे. एकूणच वाचकांच्या सर्व प्रकारच्या समस्या बातम्यांमधून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

मुख्यत्वे समाजमनातील नकारात्मक विचार कमी करण्यासाठी, डिजिटल इंडिया संकल्पना फलद्रूप होण्यासाठी, योग्य बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी चेकमेट टाईम्सकाम करत आहे. त्यात ताज्या बातम्या, महत्वाच्या घडामोडी, ठळक बातम्या, राजकीय, सांस्कृतिक, गुन्हेगारी, औद्योगिक, महिला, प्रॉब्लेम झोन, तंत्रज्ञान, समाजकार्य, मनोरंजन, खेळ, शैक्षणिक, धार्मिक, साहित्य, कला, आरोग्य, कृषी, आर्थिक, दिनविशेष, जीवनशैली, व्यासपीठ, आम्ही असेही, परिचय मराठी मातीचा, युवा मंच यांसह चेकमेट विशेष, चेकमेट मसाला, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, देश, विदेश इत्यादी सदरांमधून वाचकांना दर्जेदार बातम्या आणि लेखांचा खजाना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

 

डिजिटल इंडियाची पाळेमुळे घट्ट होत आहेत. आज प्रत्येकाकडे “स्मार्ट फोन” आहे, त्यावर इंटरनेट’ची सुविधा आहे, सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे. आम्ही देखिल फेसबुक पेज, ट्विटर, व्हाटस अॅप ग्रुप यांसारख्या सोशल मिडीयावरून बातम्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसार करत आहोत. त्यातच चेकमेट टाईम्स धडाकेबाज, इतर माध्यमांपेक्षा काहीतरी वेगळ्या पठडीतल्या बातम्या देत आहे, निर्भीड बातम्या इथेच वाचायला मिळतात. एकूणच समाजमनाचा आरसा म्हणून चेकमेट टाईम्स कडे पहिले जात आहे. त्यामुळे चेकमेट टाईम्सला समाजातील सर्व प्रकारचा मोठा वाचकवर्ग वेगाने प्राप्त होत आहे. त्याला आपल्यासारख्या वाचक, जाहिरातदारांचे सहकार्य लाभल्यास आम्ही वाचकांपर्यत हि सेवा पुरवण्यात आणखीन मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ यात शंका नाही.

 

त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आमची “चेकमेट संस्कारदर्शिकावाचण्यास, पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदरील संस्कारदर्शिका हि इतर दिनदर्शिकांपेक्षा निश्चितच कित्तेक पटींनी वेगळी असल्याचे आपण प्रत्यक्ष पाहिल्यास निदर्शनास येईल याची आम्हाला खात्री आहे. वाचकांना दिल्या जाणाऱ्या माहितीची, बारकाईने अभ्यास करून, जास्तीत जास्त सखोल, वेगळी आणि दर्जेदार माहिती देणे हा आमचा उद्देश या संस्कारदर्शिकेत स्पष्टपणे दिसेल. पुणे शहरातील वारजे, शिवणे, कर्वेनगर, उत्तमनगर भागात पूर्णतः निशुल्क वितरीत केली जात असलेली हि संस्कारदर्शिका अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहे.

 

......... आणि आता सर्वात महत्वाचे. उत्पन्नाशिवाय कोणतीही सेवा पुरवणे केवळ अशक्यच. त्यामुळे जशा इतर प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिराती असतात, त्याचप्रमाणे इथे देखिल असणार आहेत. मात्र “चेकमेट”चा उद्देशच मुळात व्यवसाय करायचा नाही, सेवा पुरवायची आहे असा असल्याने जाहिरातदारांना अतिशय अल्प दरात जाहिरात करता येणार आहे. त्यातही जनतेस पोटास लावणे आहे या छत्रपती शिवरायांच्या उक्तीला जागत चेकमेट टाईम्स मध्ये नोकरीविषयक हे जाहिरातीचे सदर पूर्णत: मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे कर्मचारी हवे असोत, त्यांनी आपल्या जाहिराती आमच्याकडे पाठवून, आमच्या या प्रयत्नात सहकार्य करावे हि नम्र विनंती.

 

तसेच जन्मदिन अभिष्टचिंतन या सदरात एकदम अत्यल्प दरात (वाढदिवसाच्या केक’च्या किमतीत) सात दिवसांसाठी जाहिरात करता येणार आहे. वेबपेज वरील मुख्य मोठी जाहिरात, जी पेज उघडल्या उघडल्या समोर दिसतेच, अशी आहे. त्यापेक्षा लहान पाच जाहिरातीचे बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यातील दोन बॉक्स प्रत्येक बातमी मध्ये देखिल दिसणार आहेत. त्यामुळे वाचक कोणतीही बातमी वाचत असेल, तरी तिकडे आपली जाहिरात दिसणार आहे. त्याने ती बातमी शेअर केल्यास तेवढ्या पटीत ती जाहिरात पसरणार आहे. या सर्व जाहिरातींना स्लायडर असल्याने वाचकांचे हमखास जाहिरातीकडे लक्ष जात असल्याचा अनेक वाचकांनी अनुभव बोलून दाखवला आहे. तसाच तो आपण देखिल घेतला असेल.

 

त्याचबरोबर त्या जाहिरातीचा जाहिरातदाराला जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी आम्ही त्या जाहिरातीला जाहिरातदाराची वेब लिंक (उदा: आपण पुरवलेली वेब, फेसबुक लिंक) जोडलेली असते. त्यामुळे वाचकाने जाहिरातीवर क्लिक केल्यास वाचक थेट जाहिरातदाराच्या वेबसाईट अथवा फेसबुक पेजवर जाऊन जाहिरातीबाबत सखोल माहिती मिळवू शकतो. त्यामुळे जाहिरातदाराची प्रसिद्धी अतिशय मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही. काही विशिष्ठ जाहिराती बातमीच्या मध्ये देखिल देण्यात येणार असून, त्याची सविस्तर माहिती आमच्याशी संपर्क करून आपण मिळवू शकता. एकूणच आम्ही पुरवत असलेल्या सर्व प्रकारच्या जाहिरातींचे दर देखिल इतर प्रसिद्धी माध्यमांपेक्षा अत्यल्प असून, त्यातून जाहिरातदाराला मिळणारा फायदा मात्र इतर प्रसिद्धी माध्यमांपेक्षा खूप जास्त असल्याचा आमच्या जाहिरातदारांचा अनुभव आहे.

 

त्याचबरोबर आमच्या “चेकमेट संस्कारदर्शिका या दिनदर्शिकेत देखिल आपण जाहिरात देऊ शकता. यातील जाहिरात वर्षभर लोकांच्या घरात तर राहणार आहेच, शिवाय इंटरनेट कॉपी वर देखिल जगभरात आपली जाहिरात पोचते. “चेकमेट संस्कारदर्शिका हि संकल्पना देखिल मुळात, लोकांमध्ये “संस्कार” पोचवणे यासाठी सुरु केली असल्याने, या संस्कारदर्शिका मध्ये देखिल आम्ही फक्त सेवा पुरवण्यासाठीचा जाहिरात दर आकारत असून, अगदी काही क्षणात डोळ्यासमोरून कचऱ्यात जाणाऱ्या पत्रक (पॅम्पलेट)च्या दरात, आपण महिनाभर लोकांच्या डोळ्यासमोर आणि वर्षभर लोकांच्या घरात आणि जगभरातल्या संगणकात राहणारी जाहिरात करू शकता.

 

त्याचबरोबर आपल्या मागणीनुसार, “मजकूर आमचा, जाहिरात तुमची” या तत्वानुसार पूर्ण दिनदर्शिका सामान्य दिनदर्शिकेच्या बाजारातील दरापेक्षा अत्यंत कमी दरात आम्ही आपणांस छापून देतो. याचा सर्व प्रकारचे उद्योजक आणि राजकीय मंडळी लाभ घेऊ शकतात. कोणतीही मोठी किंमत असलेली भेटवस्तू देण्यापेक्षा लोकांच्या घरात, एका अभ्यासपूर्ण, इतरांपेक्षा वेगळी असलेली, सातत्याने संस्कार करणारी “चेकमेट संस्कारदर्शिका” जास्त वापरली जाईल, त्यातून आपला आणि आपल्या व्यवसायाचा प्रचार मोठ्या प्रमाणात होईल हि आमची खात्री नव्हे तर अनुभव आहे. त्यामुळे इथे जाहिरात करणे देखिल आपणांस अधिक फायद्याचे ठरेल. आपण एकदा जाहिरात देऊन अवश्य खात्री करा.

 

आमच्या जाहिराती विभागाची माहिती वाचल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. आपली जाहिरातीची जागा आत्ताच राखून ठेवा. अधिक माहिती आणि जाहिरात दर जाणून घेण्यासाठी e-mailadvt@checkmatetimes.com, व्हाटस अॅप +91 8793344709 , किंवा संपर्क कप्प्यात दिलेल्या पत्त्यावर भेटून चौकशी करू शकता.

 

आपला कृपाभिलाषी

धनराज मनोहर माने

संस्थापक संपादक

 

चेकमेट पब्लिकेशन्स अॅड पब्लिसिटी

संपर्क : 879 33 44 709, 97 30 30 72 27