आमच्या विषयी:

नमस्कार आदरणीय वाचक,

 

सर्वप्रथम आपण चेकमेट पब्लिकेशन्स अॅड पब्लिसिटीच्या “चेकमेट टाईम्स”च्या या ऑनलाईन न्यूज पोर्टल’ला भेट दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार...!

 

“चेकमेट टाईम्स” हे “डिजिटल इंडिया” संकल्पनेतील महाराष्ट्रातील पहिले ऑनलाईन न्यूज पोर्टल असून, ते आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यानंद झाला आहे. “व्यवसाय नाही, सेवा म्हणून सुरु केलेले हे न्यूज पोर्टल” प्रामुख्याने पुणे शहर / जिल्हा यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक ताज्या घडामोडीसह, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या, लोकांची गरज असलेल्या, वाचकांची मागणी असलेल्या, मोठ्या समस्येपासून लहानात लहान समस्येसह, तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या, त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी तसेच, त्यांना न्याय देण्यासाठी सुरु केले आहे. एकूणच वाचकांच्या सर्व प्रकारच्या समस्या बातम्यांमधून सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

 

सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या येत नाहीत. त्यांच्यावर अथवा सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर झालेल्या अत्याचारांच्या बातम्यांना वाचा न फोडता, त्या परस्पर दाबल्या जातात. बातम्या आल्या तरी त्या स्थानिक पातळीवर येत असल्याने, त्याचे मोठे परिणाम दिसत नाहीत. सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांचे उपक्रम जनहिताचे असतात, मात्र कमी पैशात आणि जाहिरातबाजी न करता राबवलेले असल्याने त्याला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही. प्रसिद्धी मिळालीच तर बातम्या स्थानिक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या असल्याने त्यांची राज्यस्तरावर, राष्ट्रस्तरावर योग्य ती दखल घेतली जात नाही. अशा सर्व बाबीवर न्याय्य व सहज उपाय असावा, या संकल्पनेतून “चेकमेट टाईम्स” या ऑनलाईन न्यूज पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.

 

तळागाळापर्यंतच्या सर्वसामान्य सकारात्मक बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या सकारात्मक बातम्या वाचक जगभरात कोठेही असले, तरी इंटरनेटच्या माध्यमातून सहजरीत्या वाचू शकणार आहेत. यातील बहुतांशी सर्व बातम्या छायाचित्रासह प्रकाशित केल्या जाणार आहेत. “चेकमेट टाईम्स” मध्ये फक्त वाचल्या जाणाऱ्या बातम्या नसून, आवश्यक तेथे चलतचित्र (व्हिडीओ) न्यूज देखिल आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ मुलाखती, वाचकांना बातमी कशी वाटली त्याबाबत बातम्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी बातमीखाली जागा (कमेंट बॉक्स), लाईक / डीस-लाईक, आपल्या पसंतीची बातमी शोधण्यासाठी सोपे सर्च इंजिन आणि आपल्याला आवडलेली बातमी सोशल मिडीयावर (उदा: फेसबुक, ट्विटर, व्हाटस अॅप) शेअर करण्यासाठी बातमीशेजारीच आयकॉन देखिल अंतर्भूत करण्यात आले आहेत.

 

मुख्यत्वे समाजमनातील नकारात्मक विचार कमी करण्यासाठी, डिजिटल इंडिया संकल्पना फलद्रूप होण्यासाठी, योग्य बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी “चेकमेट टाईम्स” काम करणार आहे, करत आहे. त्यात ताज्या बातम्या, महत्वाच्या घडामोडी, ठळक बातम्या, राजकीय, सांस्कृतिक, गुन्हेगारी, औद्योगिक, महिला, प्रॉब्लेम झोन, तंत्रज्ञान, समाजकार्य, मनोरंजन, खेळ, शैक्षणिक, धार्मिक, साहित्य, कला, आरोग्य, कृषी, आर्थिक, दिनविशेष, जीवनशैली, व्यासपीठ, आम्ही असेही, परिचय मराठी मातीचा, युवा मंच यांसह चेकमेट विशेष, चेकमेट मसाला, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, देश, विदेश इत्यादी सदरांमधून वाचकांना दर्जेदार बातम्या आणि लेखांचा खजाना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

 

“चेकमेट टाईम्स” वर आपल्याला काही नाविन्यपूर्ण अर्थात वेगळ्या नावाची सदरे वाचण्यास मिळणार आहेत. उदा, “आम्ही असेही” या सदरात, नागरिकांच्या वेगवेगळ्या चांगल्या वाईट कृत्यांवर प्रकाश टाकण्याचे काम “चेकमेट टाईम्स” करणार आहे. “चेकमेट”चा मूळ उद्देशच “चांगल्या गुणांचे वर्धन, आणि दोषांचा भागाकार” असे असल्याने, नागरिकांच्या चांगल्या गुणांची स्तुती करणारे आणि वाईट गुणांवर टीका करणारे, तसेच आत्मपरीक्षण करण्यास भाग पडणारे लेख यामध्ये असणार आहेत. “परिचय मराठी मातीचा” या सदरात, महाराष्ट्रातील काही समोर न आलेली पर्यटन स्थळे आणि नागरिकांनी आवर्जून भेटी देऊन पाहणी करावी अशा स्थळांची माहिती वाचकांना पुरवण्यात येणार आहे. तर “युवा मंच” या सदरात, तरुणाईला मुक्तहस्ते वाव देण्यात आला असून, त्यांना एन्जॉय लाइफस्टाइल बरोबरच “देश बदल रहा है” ची अनुभूती येण्यासाठी आणि आपण देशाचे देखिल काही तरी देणे लागतो, हि बाब मनावर बिंबवण्यासाठी “चेकमेट टाईम्स” या “युवा मंच” सदरातून प्रयत्न करणार आहे.

 

सबब आपल्या भागातील समस्या, समाजोपयोगी कार्यक्रम, घटनांची माहिती आम्हाला पाठवा. आम्ही त्याची सत्यता पडताळून त्याला “चेकमेट टाईम्स’च्या या ऑनलाईन न्यूज पोर्टल” वर आपले नाव आणि छायाचित्रासह १०० % ठळक प्रसिद्धी देऊ. (बातमीत नाव अथवा नामोल्लेख नको असल्यास, आम्ही ते गुप्त ठेवण्याचे देखिल लेखक / वाचकांना वचन देतो.). त्यामुळे “लिहा बिनधास्त”, तुम्हाला आणि तुमच्या मनातील आवाजाला बळ देण्याचे काम आम्ही करतोय. वाचक आपले सर्व प्रकारचे लेख, आपले बहुमोल सल्ले आम्हाला “गुप्त पत्रकार आणि मुक्त पत्रकार” या ठिकाणी क्लिक करून सहजरीत्या पाठवू शकतात. किंवा आमच्या ‘सहभागी व्हा’, ‘संपर्क’ या कप्प्यांमध्ये असलेल्या संपर्क क्रमांक, मेल आयडी अथवा कार्यालयीन पत्त्यावर सोप्या पद्धतीने पाठवू शकता.

 

आम्ही फेसबुक पेज, ट्विटर, व्हाटस अॅप ग्रुप यांसारख्या सोशल मिडीयावरून बातम्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसार करणार आहोत. त्याला आपल्यासारख्या वाचकांचे सहकार्य लाभल्यास आम्ही अल्पावधीतच लाखो वाचकांपर्यत पोचू यात शंका नाही.

 

या ठिकाणी आपल्याला आमची अर्थात चेकमेट पब्लिकेशन्स अॅड पब्लिसिटीची “चेकमेट संस्कारदर्शिका” वाचण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदरील संस्कारदर्शिका हि इतर दिनदर्शिकांपेक्षा निश्चितच कित्तेक पटींनी वेगळी असल्याचे आपण प्रत्यक्ष पाहिल्यास निदर्शनास येईल याची आम्हाला खात्री आहे. वाचकांना दिल्या जाणाऱ्या माहितीची, बारकाईने अभ्यास करून, जास्तीत जास्त सखोल, वेगळी आणि दर्जेदार माहिती देणे हा आमचा उद्देश या संस्कारदर्शिकेत स्पष्ट दिसतो. पुणे शहरातील वारजे, शिवणे, कर्वेनगर, उत्तमनगर भागात पूर्णतः निशुल्क वितरीत केली जात असलेली हि संस्कारदर्शिका अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. एकूणच या “चेकमेट संस्कारदर्शिका” या आमच्या उत्पादनाद्वारे आम्ही समाजात सकारात्मक विचार वाढवण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न केलेला आपणास पाहायला मिळेल.

 

......... आणि आता सर्वात महत्वाचे. उत्पन्नाशिवाय कोणतीही सेवा पुरवणे केवळ अशक्यच. त्यामुळे जशा इतर प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिराती असतात, त्याचप्रमाणे इथे देखिल असणार आहेत. मात्र आमचा उद्देशच मुळात “व्यवसाय करायचा नाही, सेवा पुरवायची आहे” असा असल्याने जाहिरातदारांना अतिशय अल्प दरात जाहिरात करता येणार आहे. त्यातही “जनतेस पोटास लावणे आहे” या छत्रपती शिवरायांच्या उक्तीला जागत आम्ही “नोकरीविषयक” हे जाहिरातीचे सदर पूर्णत: मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे कर्मचारी हवे असोत, त्यांनी आपल्या जाहिराती आमच्याकडे पाठवून, आमच्या या प्रयत्नात सहकार्य करावे हि नम्र विनंती. तसेच जन्मदिन अभिष्टचिंतन आणि इतर जाहिरातींबाबत सविस्तर माहितीकरिता आमच्या जाहिरातविषयक कप्प्यात अधिक माहिती वाचा.

 

आमच्याविषयी माहिती वाचल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद

आपला कृपाभिलाषी

धनराज मनोहर माने

संस्थापक संपादक

 

 

 

चेकमेट पब्लिकेशन्स अॅड पब्लिसिटी

संपर्क : 879 33 44 709, 97 30 30 72 27

 

 

चेकमेट पब्लिकेशन्स अॅड पब्लिसिटीच्या “चेकमेट टाईम्स” या ऑनलाईन न्यूज पोर्टल किंवा “चेकमेट संस्कारदर्शिका” या दिनदर्शिकेसह पूर्ण न्यूज पोर्टल वर व्यक्त करण्यात आलेल्या मतांशी, त्याचबरोबर आमच्या उत्पादनांवर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीबाबत मालक, संपादक, पत्रकार, तसेच संस्थेशी निगडीत कोणतीही व्यक्ती सहमत असतीलच असे नाही. त्यामुळे सर्वांनी याची नोंद घेऊन, आपल्या पातळीवर खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावेत. आमच्या “चेकमेट टाईम्स” या ऑनलाईन न्यूज पोर्टल वापराबाबतच्या सविस्तर नियम आणि अटी आपण वाचल्या असतीलच.