“अ डॉट कॉम मॉम” या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर लाँच
Sunday, Sep 4 2016 8:53AM    CTNN
Tags: a dot com mom, a dot com mom social media marathi movie, dr meena nerurkar 1000000543

लवकरच होणार प्रदर्शित

 

पुणे, दि.४ (CTNN): आजच्या या टेक्नोवर्ल्डमध्ये सगळ्याच गोष्टी डिजीटल झाल्या आहेत. याचीच देणगी म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स, ज्यांच्यामुळे आपआपसांतील नेटवर्क खूप स्ट्राँग झाले आहे. उत्तम पध्दतीने, थोड्या वेळात हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याच्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत हल्ली काही गोष्टी डिजीटली लाँच केल्या जातात. गेले काही दिवस सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर होणाऱ्या “अ डॉट कॉम मॉम” या चित्रपटाचे पोस्टर ही असेच डिजीटली लाँच करण्यात आले.

 

साधी भोळी आई अमेरिकेत जाऊन काय काय प्रताप करते याचा अंदाज पोस्टरवरून येतो. अमेरिकेत चित्रीत झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट, ज्यात सुंदरा मनामध्ये भरली आणि अवघा रंग एकचि झाला अशी नाटके आपल्यासमोर आणणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशा तिहेरी भूमिकेत आहेत. या चित्रपटात त्यांनी मॉम ची भूमिका साकारली असून त्यांच्या मुलाच्या भूमिकेत मराठमोळा सर्वायव्हर साई गुंडेवार आहे. तर विक्रम गोखले बाबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या अ डॉट कॉम मॉम च्या सुनेची भूमिका साकारली आहे अमेरिकन कलाकार अपूर्वा भालेराव हिने.

 

अ डॉट कॉम मॉम च्या पोस्टरवरूनच आपल्याला हसवणाऱ्या या मॉमचे प्रताप पाहण्यासाठी अ डॉट कॉम मॉम पाहायलाच हवा.

18   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Entertainment,   Business Category: NA   Similar News ID: 1000000015