पुण्यात शिवरात्री ते हनुमान जयंती पर्यंत होतो हनुमान चालीसा पठण सोहळा
Thursday, Mar 9 2017 11:41AM    CTNN
Tags: pune, hanuman chalisa, mahashivratri, Shree Salasar Hanuman Chalisa Board 1000002998

श्री सालासर हनुमान चालीसा मंडळाचा उपक्रम

पुणे, दि.८ (CTNN): शिवरात्रीच्या पावन पर्व पासुन श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ द्वारा पुण्यात संगीतमय हनुमान चालीसा पठणाच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून ॐ गं गणपतये नमो नमः.. ॐ नमः शिवाय.. बाबा हनुमान.. सीताराम सीताराम.. अश्या अनेक चालींवर सुवाद्या संगीतमय हनुमान चालीसाने महाशिवरात्रिचा उत्सव रंगतदार ठरला.

 

पुणे स्थित श्री. सालासर हनुमानचालिसा मंडळ, गेल्या १० वर्षापासून महाशिवरात्रि ते हनुमानजयंती पर्यंत दररोज संगीतमय हनुमान चालीसाचे पाठ करत आहे. या वर्षी (दि.२४) फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रिच्या पावन पर्व पासून हया धार्मिक उपक्रमाची सुरवात श्री.भिकरदास मारुती मंदिर, सदाशिव पेठ येथुन भक्तिमय वातावरणात झाली.

 

मंडळाचे यंदाचे १० वे वर्ष आहे. आधी भक्तांच्या घरी हा उपक्रम होत असे पण गेल्या ४-५ वर्षांपासून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घ्यावा या हेतुन पुणे व पुण्याजवळील विवीध मंदिरामध्ये, सोसायटीमध्ये, वृद्धाश्रमात हा उपक्रम राबवण्यास सुरवात करण्यात आली.

 

यंदाच्या वर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर सारसबाग, नारायणी धाम लोणावळा, भिकरदास मारुती मंदिर अश्या विविध मंदिरांचा तसेच संगमनेरचा देखील समावेश आहे.

 

दररोज रात्री ९.३० वाजता पाठाची सुरवात होते. ११ वेळेस विविध चालिनमध्ये संगीतमय हनुमान चालिसाचा पाठ, त्यानंतर आरती व मंत्रपुष्पंजलि असा दररोजचा नित्य क्रम असतो. दररोज आरतीमध्ये जमा झालेल्या राशिचा उपयोग पूर्णावतीच्या होम साठी केला जातो व उर्वरित रक्कम समाजाच्या विधायक कामांसाठी केला जातो. मंडळाद्वारे अनेक सामाजिक कार्य केले जातात ज्यामध्ये निराधार कुटुंबास मदत, पंढरपुरच्या वारीत पालखिच्या वेळी वारकार्यांची सेवा, युवा वर्गातील मुलांसाठी इंस्पिरेशनल एवं मोटिवेशनल लेक्चर, अंधशाळा, अनाथालय व वृद्धाश्रम यांना वस्तुरूप एवं आर्थिक मदत अश्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. तसेच रक्ताचा जाणवनारा तुटवडा लक्षात घेत रविवार (दि.२६) मार्च २०१७ रोजी आर. सी. एम् हायस्कूल, दारूवाला पूल, कसबा पेठ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 

 

या ४७ दिवसांच्या उपक्रमामध्ये लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. या उपक्रमाची सांगता हनुमानजयंतीच्या दिवशी भव्य होम-हवानाने केली जाते. समाजातील विविध स्तरातील प्रतिष्ठित व्यक्ति देखील या ४७ दिवसांच्या उपक्रमात आवर्जून सहभागी होतात.

72   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006