मशिदीवरील भोंगे इस्लामचा भाग नाही: मोहम्मद अली
Saturday, Apr 22 2017 8:36PM    CTNN
Tags: The mosque is not part of Islam, Mohammed Ali, Sonu Nigam, Babu Bhai, Ajan, Namaz, 1000003504

१२ मशिदींवरील भोंगे उतरविण्यात आले यश

सोनू निगमची पाठराखण


मुंबई, दि.२२ (CTNN): मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने ट्विट केल्यानंतर चांगलाच वाद उफाळलाc असतानाच इस्लाम धर्मात मशिदींवरील भोंग्यांना काहीही स्थान नसल्याचे सांगत मोहम्मद अली उर्फ बाबू भाई गेली २४ वर्ष लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला आता यश आले असून त्यांच्या भूमिकेला मान्यता देत १२ मशिदींवरील भोंगे उतरविण्यात आले आहेत.

 

मशिदींवरील भोंग्यांवरून जान आणि नमाज अदा करणे इस्लामच्या कोणत्याही कायद्यात नाही. तसेच शर्यतमध्ये ही त्याचा उल्लेख नाही. इस्लामला १४०० वर्षांचा इतिहास आहे. या धर्मातल्या पवित्र कुराणमध्ये जान तोंडी करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. केवळ सामाजिक बदल होत गेल्याने मशिदीवर भोंगे आले आहेत. या भोंगयांमुळे इतर धर्मियांना का त्रास द्यावा? असा प्रश्नदेखील बाबू भाई यांनी विचाराला होता.

 

तसेच मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मोहम्मद अली यांनी संतोष पाचलग आणि डॉ. बेडेकर यांच्या सोबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मौलवींचे ६४ फतवे शर्यत, कुराण आणि आयत मधील संदर्भांमुळेच न्यायालयाने मशिदींवरील भोंगे धार्मिक प्रार्थनेचा भाग नसल्याचे सांगितले असल्याचा दावा त्यांनी केला.

 

मुस्लिम धर्मात राहून मशिदींवरील भोंग्यांना विरोध करणे सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले. या २४ वर्षात अनेक धमक्या आणि लोकांच्या शिव्या शाप पचवले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या धर्मात सामाजिक शांततेचा विचार करणारी माणसे असल्यानेच काही मशिदींवरील भोंगे उतरले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, मोहम्मद अली यांच्या लढ्याला यश आले असून त्यांनी मुस्लिम धर्मियांचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न केला केला. त्याप्रमाणे मुंबईतील मुस्लिम बहुल असलेल्या बेहरामपाडा भागात ४, ज्ञानेश्वर नगरमध्ये ३, राजीव नगरमध्ये २ भारत नगरमध्ये १ मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत. तर मध्यप्रदेशातील शैडुल आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी येथेही आपल्या नातेवाईकांच्या मदतीने अली यांनी मशिदींवरील भोंगे उतरविले आहेत.

 

बाबू भाई यांच्याकडून सोनू निगमची पाठराखण

बाबूभाईंनी सोनू निगमने केलेल्या वक्तव्याची पाठराखण केली असून इतकेच नाही तर सोनू निगमविरोधातील फतव्यांचीही निंदा केली आहे.


नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणे किंवा घोषणा करणे असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते. त्यामुळे कोणीही धर्माच्या नावाखाली कोणतीही गोष्ट खपवून न घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Mumbai,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006