समाजातील विषमता नष्ट करतेय निरंकारी मिशन; राज्यमंत्री दिलीप कांबळे
Tuesday, Apr 25 2017 2:30PM    CTNN
Tags: sant nirankari baba, State Minister Dilip Kamble, District level Blood Donation Camp, Nirankari Mandal, Nirankari Mission 1000003559

निरंकारी मंडळाचे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर संपन्न

 

पुणे, दि.२५ (CTNN): संपूर्ण विश्वात निरंकारी मिशनची समाज हिताची कार्य सुरू आहेत, समाज प्रबोधन,करोडो कुटुंबे स्थिर झाली, विषमता नष्ट करण्याचे काम होत आहे. संतांचे आशीर्वाद असेल तर हातून चांगले काम होते.  स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण सारख्या उपक्रमातून प्रेरणा मिळते, या कार्याचा आदर्श इतर संस्थानी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

 

संत निरंकारी मंडळ पुणे झोनच्या वतीने मानव एकता दिवस निमित्त जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. नामदार दिलीप कांबळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्धघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. या शिबिरात शेकडो निरंकारी भक्तांनी सक्रिय सहभाग घेऊन उत्साहात रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात ५८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

संत निरंकारी मंडळाचे ब्रम्हलीन सद्गुरू बाबा गुरुबचनसिंग जी महाराज यांच्या पावन समूर्तीप्रित्यर्थ विद्यमान सदगुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपूर्ण भारतभर रक्तदान शिबिर व मानव एकता दिवस समारोह चे आयोजन करण्यात आले होते.

 

या शिबिरात पुणे शहरसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने निरंकारी भक्त सहभागी झाले होते मार्केट यार्ड येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे झालेल्या शिबिर प्रसंगी महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी सभापती मंगलदास बांदल, सिद्धिविनायक ट्रस्ट चे संचालक विजय दरेकर, यांच्यासह निरंकारी भक्त व सेवादल मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे पुणे जिल्हा प्रमुख ताराचंद करमचंदानी, सेवादल अधिकारी पांडुरंग दळवी, रमेश जगताप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

अरमेड फोर्स मेडिकल कॉलेज, औध सिव्हील हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, ससून रुग्णालय च्या वतीने डॉ.रौनक दुबे, डॉ. सी.जी.कलाले, डॉ.मनीष गायकवाड यांच्या टीमने रक्त संकलित केले. व निरंकारी मंडळाचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

 

मानवतेचे मसिहा सद्गुरू बाबा गुरुबचनसिंगजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात मानवता प्रस्थापित करण्याच्या हेतूने कार्य केले. त्यांच्या समुर्तिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित केले ही मानवतेची सेवा आहे, निरंकारी मिशन आध्यात्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत असे उद्गार महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी काढले. यावेळी सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी केले मंगेश पायगुडे यांनी आभार मानले. 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006