माउलींच्या समाधीला चंदन उटी; साकारला मनमोहक विष्णू अवतार
Saturday, Apr 29 2017 6:09PM    CTNN
Tags: aalandi, shree dnyaneshwar maharaj, swakam seva mandal, vishnu avatar, Maali Vishnu incarnation using Chandana 1000003671

आळंदी, दि.२९ (CTNN): अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, स्वकाम सेवा मंडळ व गांधी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथापरंपरेचे पालन करीत गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या चार चंदन ओटींपैकी काल शुक्रवार (दि.२९) रोजीची तिसरी ओटी विष्णू अवताराच्या रुपात साकारण्यात आली होती.

 

सुमारे वीस किलो गंधक (चंदनाचा) वापर करून माऊलींच्या संजीवन समाधीवर अतिशय देखणे, मनोहारी, मनमोहक व नेत्रात साठवून ठेवावे असे गरूड वाहक विष्णू अवतार रूप सर्वाना पहावयास मिळाले.

 

साडेतीन तास परिश्रम घेत संपूर्ण गांधी कुटुंबातील सदस्यांनी या अवताराची मांडणी केली. गांधी परिवाराने प्रथापरंपरेचे पालन करीत चालविलेल्या चंदन ओटीत हातभार म्हणून गेल्या सतरा वर्षांपासून दर अक्षय्य तृतियेला येथील स्वकाम सेवा मंडळ देखील या उपक्रमात सहभागी होताना दिसत आहे. चंदन ओटीचे मनोहारी रूप साकारल्यानंतर स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने गांधी परिवारातील सर्व सदस्य व बल्लाळेश्वर वाघमारे, भरत घाडगे आदींचा यथोचित सन्मान अध्यक्ष सुनिल तापकीर यांचे हस्ते करण्यात आला.

 

यावेळी स्वकामचे संस्थापक डॉ. सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर, सुभाष बोराटे, दत्तोबा पठारे, धनाजी गावडे, सुभाष चौधरी, उदय कुलकर्णी, विलास पठारे, लक्ष्मण रासकर, आशा तापकीर, सुनंदा चव्हाण व जनाबाई सांडभोर आदी उपस्थित होते.

 

यानिमित्ताने माऊली मंदिरातील कारंजा मंडपात सुवासिनींसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन पासून भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन बारीचे उत्तम नियोजन हे संस्थानचे सरव्यवस्थापक माऊली वीर यांनी केले होते.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006