बाबा हरदेवसिंहजी महाराज सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूती पुरस्काराने सन्मानित
Saturday, May 6 2017 3:46PM    CTNN
Tags: sardevsinghji maharaj, Best Spiritual Vibhuti Award, aadhyatmik vibhuti award, Suluchi Princess, Maria Torres, We Care for Humanity, nirankari mission, Nation New York 1000003777

अमेरिकेतील सुलूची राजकुमारी मारिया टोरेस यांची दिल्लीमध्ये घोषणा

 

दिल्ली, दि.६ (CTNN): वुई केअर फॉर ह्यूमॅनिटी (We Care for Humanity) या अमेरिकेतील मानवतेचा बहुपक्षीय विश्वस्तरीय विकास घडवून आणण्यासाठी समर्पित संस्थेद्वारे मागील वर्षी ब्रह्मलीन झालेले संत निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूति अॅवार्ड-२०१७ द्वारे सन्मानित करण्यात आले आहे.

 

निरंकारी मिशनच्या वर्तमान सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात दिल्लीमध्ये आयोजित एका भव्य निरंकारी सत्संग समारोहामध्ये संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा तथा जगातील महान विभूतिंना सन्मानित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या सदर संस्थेच्या पुरस्कार समितीच्या अध्यक्षा सुलू देशाच्या राजकुमारी मारिया टोरेस यांनी ही घोषणा केली. अशी माहिती पुणे झोनल प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी दिली.

 

राजकुमारी मारिया टोरेस यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सदगुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांना संस्थेच्या वतीने राष्ट्र संघ न्यूयार्क येथे ऑगस्ट, २०१७ मध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या चौथ्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी आमंत्रित केले आहे, ज्यायोगे या संमेलनात भाग घेण्यासाठी आलेल्या जगभरातील प्रतिनिधींना बाबाजींची आध्यात्मिक विचारधारा आणि त्यांच्या महान योगदानाविषयी अवगत केले जाऊ शकेल.

 

ही संस्था मानवाधिकार, विश्व शांती, प्रदूषण रहित वातावरण, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन तसेच सशक्तिकरण यांसारख्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असून दरवर्षी सदर संस्थेच्या वतीने जगातील सर्वश्रेष्ठ विभूतींचा त्यांच्या विविध क्षेत्रातील महान योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरव करत असते. बाबा हरदेवसिंहजींनाही त्यांच्या मानवतेच्या प्रति अत्यंतिक प्रेम, करूणा, सेवा भाव यांसाठी सन्मानित केले गेले असून त्याचा प्रभाव केवळ निरंकारी जगतावरच नव्हे तर अवघ्या विश्वातील प्रत्येक मानवाच्या सदैवकाळ कायम राहील.

याप्रसंगी राजकुमारी मारिया यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, बाबाजींचा सन्मान करत असताना खरं तर आम्ही स्वत:लाच सन्मानित करत आहोत. बाबाजींनी अवघ्या विश्वाला हेच समजावले की, हिंसा आणि गरीबीतून मुक्त होऊ इच्छित असाल तरा प्रत्येक मानवाला ईश्वराशी नाते जोडावे लागेल.

 

सदगुरू माता सविन्दर हरदेवजी महाराज यांनी राजकुमारी मारिया यांना धन्यवाद देताना म्हटले की, बाबाजींना हा जो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पुरस्कार दिला जात आहे याचा अर्थच असा आहे की, बाबाजींचा प्रेम, एकत्व व शांतीचा संदेश जगभरात पोचलेला आहे. तरीही अजून असे काही भाग राहिले असतील त्याठिकाणी आपण हा संदेश पोचवायचा आहे.

 

तत्पूर्वी व्यासपीठावर आगमन होताच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा भगिनी विंदिया छाब्रा जी यांनी सन्माननीय राजकुमारी मारिया यांना शॉल घालून त्यांचे हार्दिक स्वागत केले.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: New Delhi,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000079