अनधिकृत प्रर्थानास्थळाचे बांधकाम थांबवा; अनधिकृत असल्यास करवाई करा
Thursday, May 11 2017 12:05PM    CTNN
Tags: unauthorized place of pilgrimage, unauthorized premises, Stop construction, unauthorized construction of Religious places, urulikanchan masjid, unauthorized masjid, unauthorized temple, unauthorized church 1000003814

हवेलीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर यांचे आदेश

 

उरुळीकांचन, दि.११ (CTNN): गावठाण हद्दीतील सुरू असलेल्या प्रार्थनास्थळाचे बांधकाम हे अनाधिकृत असल्याची तक्रार उरुळी कांचन येथील ग्रामस्थ अरविंद केशवलाल शहा यांनी हवेलीचे गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्या प्रार्थनास्थळाच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश कोहिनकर यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायतीला दिले आहेत.

 

गटविकास अधिकारी कोहिनकर यांनी उरुळी कांचन येथे उभारण्यात येणाऱ्या प्रार्थनास्थळाच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने दिलेली परवानगी व परवानगीनंतर प्रत्यक्षात सुरु झालेले काम या सर्व गोष्टींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रार्थनास्थळाचे बांधकाम अनधिकृत असल्यास त्या बांधकामावर ग्रामपंचायतीने कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.

 

ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांनी अनधिकृत बांधकामाच्या कारवाईवर टाळाटाळ केल्यास ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने अशा कामांवर कारवाई करून, कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश कोहिनकर यांनी दिले आहेत.

 

याबाबत ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांना विचारले असता, आज गुरुवार (दि.११) रोजी प्रार्थनास्थळाच्या बांधकामाशी संबंधित व्यक्‍तींना बांधकाम थांबविण्याची नोटीस बजाविण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम असल्याचे आढळल्यास त्यावर कारवाई करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130