कोपरे पुनर्वसन; काकडे सिटीच्या दारात आंदोलन, आंदोलक ताब्यात
Monday, May 15 2017 12:34PM    CTNN
Tags: kopare rehabilitation, kopare rehabilitation protest against sanjay kakade, kakade city, protest against sanjay kakade, sanjay kakde, yuvak kranti dal, yukrand, warje police, warje news, latest news, pune local news 1000003893

ताब्यात घेतलेल्यांत कोपरे रहिवासी आणि युक्रांद कार्यकर्त्यांचा समावेश

 

पुणे, दि.१५ (CTNN): न्यू कोपरे गाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आज सोमवार (दि.१५) पुन्हा युक्रांद आणि कोपरे पुनर्वसन बाधीतांनी खासदार संजय काकडे यांच्या कर्वेनगर येथील काकडे सिटी समोरील पुनर्वसन इमारतीसमोर सत्याग्रह आंदोलन सुरु केले होते. मात्र आज पुन्हा या आंदोलक सत्याग्रहींना वारजे पोलीसांनी विनापरवाना आंदोलन करत असल्याबद्दल ताब्यात घेऊन आंदोलन करण्यास मज्जाव केला आहे. एकूण १२ पुरुष आणि १३ आंदोलक महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

न्यू कोपरे गावातील पुनर्वसनापासून वंचित असलेल्या कुटुंबांचे गेल्या १६ वर्षांत पुनर्वसन न झाल्याने खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली होती. मात्र प्रकल्पग्रस्त नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्यांना अटक करावी लागली होती. तर आज तिसऱ्यांदा या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

 

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने युक्रांद’चे जांबुवंत मनोहर (वय.३७), अविनाश येल्लाप्पा वांजळे (वय.२९), लक्ष्मण रामदास वांजळे (वय.२८), येल्लाप्पा नागप्पा धोत्रे (वय.५०), नंदकिशोर जगन्नाथ शेळके (वय.४२), जगन्नाथ रामभाऊ शेळके (वय.७५), कैलास द्वाराप्रसाद सिलेखान (वय.५२), सोमाजी नामदेव हांडे (वय.४५), मारुती येल्लाप्पा धोत्रे (वय.६०), संदीप जयवंत बर्वे (वय.३३), अनिल जगन्नाथ कौल (वय.५४), संतोष युहान कदम (वय.४०) यांच्यासह १३ महिलांचा समावेश आहे.

 

याबाबत बोलताना युक्रांद’चे संदीप बर्वे म्हणाले, आम्ही घटनेने दिलेल्या अधिकारातून १७ एप्रिल पासून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. खासदार संजय काकडे यांना भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र ते आम्हाला भेटत नाहीत. मात्र आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र कोपरे पुनर्वसन प्रकल्प बाधितांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असे मत बर्वे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

 

शासकीय प्रकल्पासाठी १९८९ मध्ये न्यू कोपरे गावाचे सर्वेक्षण करून यादी तयार करण्यात आली होती त्यानुसार २००१ मध्ये बहुतांशी प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनांतर्गत घरे मिळालीकाहींना मिळाली नाहीत. यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून या यादीतील काही कुटुंबे वडार व अनुसूचित जातीतील आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी युक्रांदचे संस्थापक-अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी जिल्हाधिकारी आणि विकसक खासदार संजय काकडे यांच्याशी वारंवार चर्चा केल्याचे आंदोलकांनी सांगितले.

 

त्यानंतर काकडे यांनी या कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसनाचे आश्वासनही दिलेपरंतु त्यांचे आश्वासन पोकळ ठरले. अखेर संवादाचे सर्व टप्पे संपल्यानंतर सत्याग्रहाचा निर्णय युक्रांदनी घेतला असून न्यू कोपरे गावातील प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसनापासून वंचित कुटुंबांच्या हक्काच्या घरासाठी आंदोलन सुरु करण्यात आले असल्याचे युक्रांद’च्या वतीने सांगण्यात आले आहे. आंदोलनाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

 

संबंधित बातम्या

संजय काकडेयांच्या कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन: पुन्हा अटक

http://checkmatetimes.com/News/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000003600

 

खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोरील आंदोलन; कर्त्यांवर गुन्हा दाखल

http://checkmatetimes.com/News/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000003502

 

0   
1
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000063