पुजाऱ्यांचा मुजोरीपणा; विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने पंढरपुरात भक्ताला मारहाण
Wednesday, May 17 2017 4:04PM    CTNN
Tags: Abuse of devotees, Purity of priests, Priest, Pandharpur hit the pilgrim, pandharpur crime, dattatray suse, pandharpur police station, bhagane Priest, bhagane pandit 1000003945

पंढरपूर, दि.१७ (CTNN): भाविक मोठ्या श्रद्धेने देवालयात जात असतात. मात्र अनेक देवालयांचे पुजारी भाविकांसोबत गैरव्यवहार करून मुजोरीपनाचे दर्शन घडवून देतात. असाच प्रकार पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात घडला असून विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने पंढरपुरात मंदिरातल्या पुजाऱ्याकडून एका भाविकाला मारहाण करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सुसे असे या भाविकाचे नाव असून मंदिरातील भणगे असे मुजोरीपणा दाखविणाऱ्या पुजार्याचे नाव आहे. गैरवर्तनासाठी यापूर्वीही मंदीर प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली असल्याची माहिती आहे.

 

सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हे गाभाऱ्यात पोहोचले, तेव्हा हार घालताना पुजाऱ्यांनी त्यांना रोखले, त्यामुळे झालेल्या वादानंतर पुजाऱ्याने कानशिलात मारल्याचा आरोप सुसे यांनी केला आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार भणगे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

 

दरम्यान, भाविकांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. पुजाऱ्याची चौकशी करुन तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल, से जिल्हाधिकारी आणि मंदीर समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे. मात्र अनेक वेळा अनेक मंदिरात पुजारी भाविकांसोबत मुजोरीपणा करत असल्याचे दिसून आले असल्याने प्रशासनाने त्यासाठी उपयोजना करणे गरजेचे आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130