पंढरपुरात भक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याला निलंबनाचा ‘प्रसाद’
Monday, May 22 2017 8:29AM    CTNN
Tags: dattatray suse, ashok bhanage, pandharpur temple, Suspension of the priest, Abuse of devotees, Purity of priests, Priest, Pandharpur hit the pilgrim, pandharpur crime, dattatray suse, pandharpur police station, bhagane Priest, bhagane pandit 1000004020

पंढरपूर, दि.२१ (CTNN): विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने पंढरपुरात मंदिरातल्या पुजाऱ्याकडून एका भाविकाला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी भक्ताने पुजाऱ्याच्या मुजोरीपणाबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर मंदिर समितीने शिस्तभंगाचा ठपका ठेवत पुजाऱ्याला निलंबनाचा प्रसाद दिला आहे.

 

दत्तात्रय सुसे नावाच्या एका भक्ताने आपल्याजवळील हार थेट विठ्ठलाच्या मूर्तीवर फेकला होता. यामुळे मंदिरातील पुजारी अशोक भणगे आणि सुसे यांच्यात वाद झाला होता. वाद इतक्या टोकाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी पुजाऱ्याने आपल्या मुजोरीपणाचे लक्षण दाखवत चक्क भक्ताच्या कानशिलात लावली. यामुळे सुसे यांनी अशोक भणगे यांच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

 

दरम्यान, भाविकांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. पुजाऱ्याची चौकशी करुन तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी आणि मंदीर समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. त्यानुसार मंदिर समितीने शिस्तभंगाचा ठपका ठेवत कारवाई केली असून पुढील आदेश येईपर्यंत या पुजाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर समिती सभापती राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pandharpur,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130