पुण्यात भरदिवसा मंदिराच्या दानपेट्यांची चोरी
Monday, May 22 2017 6:29PM    CTNN
Tags: vadgaon cha raja, Theft of temple pickets, temple dan peti, dan peti, temple pickets, vinayak sontakke, vyankatesh kute, vadgavcha raja, vadgaon ganpati, vadgav ganpati, vadgaon crime, vadgaon police, sinhgad road police, sinhgad road news 1000004047

दोघांना पोलीस कोठडी

 

पुणे, दि.२२ (CTNN): पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेट्याही चोरी होताना दिसून येत असून बुधवार (दि.१७) तारखेला वडगावमधल्या गणपती मंडळची दानपेटीची चोरी करणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेतून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक सोनटक्के आणि व्यंकटेश कुटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगाव येथील गणपती मंडळाच्या दानपेटीची दोन्ही आरोपींनी दिवसाढवळ्या चोरी केली होती. या घटनेने परिसरातील तसेच शहरातील सर्व मंडळांच्या दानपेटीच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता. दरम्यान, वडगावचा राजा मंडळ परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने या चोरी प्रकरणातील आरोपींना अटक केली गेली.

 

दरम्यान, आरोपींनी याआधीही एका मंदिरात चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली असून आतापर्यंत या दोघांनी किती चोऱ्या केल्या आहेत. याचाही सध्या पोलीस कसून तपास करत आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130