निरंकारी बाबा हरदेवसिंहजी ‘स्मृतीदिन’ समर्पण दिवस
Monday, May 22 2017 6:46PM    CTNN
Tags: nirankari baba hardevsingh, hardevsinghji maharaj, hardevsinghji maharaj Memorial Day, nirankari baba memorable day, hardevsinghji Dedication day, Dreamless world-dream, Pune Gangadham Satsanga Bhawan 1000004050

भिंतीविरहित जगनिर्मितीचे स्वप्न साकारण्याचा निर्धार

 

पुणे, दि.२२ (CTNN): निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा प्रथम स्मृतीदिन जगभरात व्यापलेल्या निरंकारी परिवाराच्या वतीने समर्पण दिवसम्हणून साजरा केला. यानिमित्ताने देश-विदेशात विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात येऊन त्याद्वारे बाबा हरदेवसिंहजी महाराजांच्या प्रति भक्तगणांनी आपली श्रद्धा सुमने अर्पण करत भिंतीविरहित जगनिर्मितीचे बाबाजींचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार केला. पुणे गंगाधाम सत्संग भवन येथे समर्पण दिवस सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले.

 

तब्बल ३६ वर्षे संत निरंकारी मिशनचे नेतृत्व करणारे बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी मागील वर्षी न्यूयॉर्कवरुन मॉन्ट्रीयल येथे जाताना झालेल्या कार अपघातात आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.

 

बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवता, विश्वबंधुत्व आणि भिंतीविरहित विश्वाच्या प्रतिष्ठापनेसाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. ते समकालीन सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक उत्साही सत्याचे संदेशवाहक होते. प्रत्येक व्यक्ती, समुदाय आणि राष्ट्राला त्यांचा अद्वितिय व प्रेरणादायी संदेश आपल्या वर्तमानकाळातील गरजांना अनुरुप वाटत होता. दिव्य ज्ञानाचा बोध करण्याव्यतिरिक्त मानवाच्या दैनंदिन भौतिक जीवनासाठीही ते सदोदित एक मार्गदर्शक प्रकाश बनून राहिले. त्यांची महान शिकवण जगाला सदोदित पथ प्रदर्शीत करीत राहील.

 

समर्पण दिवसाचा मुख्य संत समागम दिल्ली येथे मिशनच्या वर्तमान सद्रगुरु माता सविंदर हरदेवजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाला. याप्रसंगी बाबाजींना अपेक्षित असलेले दिव्य गुणांनी युक्त व भेदभावरहित आदर्श जीवन जगून त्यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन सद्गुरु माताजींनी निरंकारी भक्तगणांना केले. यावेळी निरंकारी मंडळाच्या वतीने नेत्रदान अभियान राबविण्यात आले पुणे येथे शेकडो निरंकारी भक्तांनी नेत्रदान फॉर्म भरून मरणोत्तर नेत्रदान संकल्प केला.

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006