मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या महाराजाला मंदिरातच बेड्या
Thursday, May 25 2017 5:48PM    CTNN
Tags: Molestation, kirtankar maharaj molestation, Porn toys, ranjangaon temple, babaji maharaj chalak, shirur police, shirur police station, shirur crime, shirur news 1000004110

शिरुर, दि.२५ (CTNN): शिरुरजवळ आश्रम चालवणाऱ्या एका किर्तनकार महाराजास मुलींसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी रांजणगांव मंदिरातून अटक करण्यात आली आहे. महाराजांच्या अटकेनंतर गावात चर्चेला उधान आले असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाजी महाराज चाळक असे अटक केलेल्या महाराजांचे नाव असून चाळक महाराज हे किर्तनासाठी शिरुर तालुक्यात चांगलेच प्रसिद्ध आहेत. तसेच शिरुर जवळ चव्हाणवाडी (ता. शिरुर) येथे लहान मुलांसाठी बाबाजी चाळक हे गेल्या अनेक वर्षांपासून आश्रम चालवत आहेत. येथील आश्रमातील मुलींशी अश्लिल चाळे केल्यानंतर या मुली घरी गेल्या. त्यानंतर त्या परत आल्याच नाहीत.

 

पालकांनी विश्वासात घेत आश्रमात न जाण्याचे कारण विचारले असता मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलींसोबत शिरुर पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. पिडीत मुलींनी तक्रार दिल्यानंतर काल बुधवार (दि.२५) रोजी रात्री पोलिसांनी चाळक महाराजांना रांजणगाव येथील मंदिरातून किर्तन झाल्यानंतर ताब्यात घेतले.

 

दरम्यान, या प्रकरणी चाळक महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश क्षीरसागर करत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130