कटप्पाविरोधात पोलीस तक्रार; अॅट्रासिटी कायद्याचा भंग
Tuesday, May 30 2017 10:57AM    CTNN
Tags: jalgaon, Police complaint against Katappa, katappa, bahubali, bahubali 2, s s rajmauli, satyaraj, khatik society, anil ravalkar, akhil bhartiy santuji briged, 1000004189

जळगाव, दि.३० (CTNN): 'बाहुबली' चित्रपट अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज यांच्याविरोधात फदार्पूर येथील अखिल भारतीय संतूजी बिग्रेडचे औंरगाबाद जिल्हा सरचिटणीस अनिल रावळकर यांनी तक्रार दिली आहे. 'बाहुबली'मध्ये कटप्पाच्या तोंडी असलेल्या एका संवादावर आक्षेप घेऊन ही तक्रार नोंदवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

'बाहुबली २' सिनेमामधील एका दृश्यात 'कटिका चीकाती' असे वाक्य कटप्पाच्या तोंडी आहे. खाटीक जात एक कलंक आहे, असा या वाक्याचा अर्थ होतो. यामुळे खाटिक समाजाने या संवादाला आक्षेप घेत एस एस राजमौली आणि सत्यराज यांच्याविरोधात अॅट्रासिटी कायद्यान्वये तक्रार दाखल केली आहे.

 

खाटिक समाज हा परंपरागत मांस विक्रीचा व्यवसाय करून आपले पोट भरतो. बाहुबली २ मध्ये आम्हाला कठोर, अमानुष व सामाजिक संकेत न मानणारे अशा स्वरुपात दाखवण्यात आले आहे. यामुळे आमच्या समाजाची बदनामी होते, असे खाटीक समाजातील संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिग्दर्शक एस.एस.राजमौली व अभिनेता सत्यराज यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

दरम्यान, यावर चित्रपट निर्माते एस एस राजमौली आणि सत्यराज यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे गरजेचे आहे. तसेच बाहुबली या चित्रपटाची कथा पुरातन आणि काल्पनिक असल्याने न्यायलय अखिल भारतीय संतूजी ब्रिगेडच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहणार का? असा मुद्दाही उपस्थित होत आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Jalgaon,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130