रक्तदान करा आणि शिर्डीच्या साईंचे व्हीआयपी पास मिळावा
Wednesday, Jun 14 2017 10:56AM    CTNN
Tags: Donate blood, Donate blood & Get a VIP pass, shirdi, shirdi sai baba, Shirdi Saibaba Institute, shirdi temple 1000004495

रांगेशिवाय दर्शन घ्या

 

शिर्डी, दि.१४ (CTNN): शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने एक अनोखी योजना सुरु केली असून या योजनेला अनेक भक्तांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. हि योजना आहे रक्तदान शिबिराची, रक्तदान करा व ताबडतोब शिर्डीच्या साईंचे दर्शन करा.

 

शिर्डी हे तिरुपतीनंतर भारतातले सर्वात श्रीमंत देवस्थान असून या देवस्थानात निरनिराळे उपक्रम सातत्याने राबविले जात असतात. शिर्डी संस्थानात आता भक्तांच्या सोयीसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत. इथल्या रक्तदान युनिटमध्ये यापुढे रक्तदान केल्यास व्हीआयपी पास मोफत दिला जाणार आहे. यामुळे रक्तदानाकडे भाविकांचा ओढा वाढेल आणि या रक्ताचा फायदा गरजूंना होईल.

 

दरम्यान, साईबाबांच्या चरणी येऊन कोणतेही दान करण्यापेक्षा रक्तदान करण्याची ही आयडीया भक्तांनाही आवडली आहे. तसेच अनेकांना व्हीआयपी पास मिळविण्यासाठी भरभक्कम रक्कम देणेही गरजेचे राहिले नाही.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006