जैन मंदिरावरील सोन्याचा मुलामा दिलेला कळस चोरण्याचा प्रयत्न
Tuesday, Jul 4 2017 7:27PM    CTNN
Tags: Jain temple, gold cloth on the Jain temple, theft in gold cloth on the Jain temple, shirur temple, ramakant bora, Mr. Godji Parshvanath Shvetambar Jain Temple, shirur police, shirur police station, 1000004782

शिरूर, दि.४ (CTNN): दोन महिन्यांपूर्वीच शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्री रामलिंग मंदिरावरील कळस चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शिरूर येथील जैन मंदिरावरील सोन्याचा मुलामा देण्यात आलेला तांब्याचा कळस चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कापडबाजार येथील श्री. गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिरावरील शंभर किलोचा तांब्याचा सोन्याचा मुलामा दिलेला कळस चोरट्यांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यात त्याला यश आले नाही. चोरट्यांचा कळस चोरून नेण्याचा प्रयत्न फसला. ही घटना सोमवार (दि.३) रोजी उघडकीस आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात रमाकांत कुंदनमल बोरा (वय ७०, रा. शिरूर) यांनी फिर्याद दिली असून बोरा हे मंदिराचे सेक्रेटरी आहेत. फिर्यादीनुसार, रविवार (दि.) जुलै रोजी संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास श्री. गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर मंदिर पूजा केल्यानंतर बंद करण्यात आले. मात्र सोमवार (दि.) जुलै रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या मंदिराचे पुजारी विष्णू परमार यांनी बोरा यांना फोन करून सांगितले कि, मंदिराचा कळस कोणी तरी काढून तो जिन्यामध्ये ठेवलेला आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच मंदिराचे सर्व ट्रस्टी मंदिराजवळ गोळा झाले असता जिन्यामध्ये असलेला हा कळस ताब्यात घेउन सीसी टीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता पहाटे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती मंदिराचा कळस चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. मात्र, हा कळस त्याला नेता आला नाही.

 

दरम्यान, मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शाळेच्या जागेतून दोरीच्या साह्याने चोरटा मंदिरावर चढल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक भीमगोंडा पाटील करत आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Shirur,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130