शिक्षणाच्या अभावामुळेच मुस्लीम समाज उपेक्षित: गिरीश बापट
Wednesday, Jul 5 2017 6:20PM    CTNN
Tags: Highest provision minority development, minority development provision, girish bapat, Lack of education, Muslim society neglected, Muslim community ignored due to lack of education, Guardian Minister Girish Bapat, 1000004803

यंदा अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक तरतूद


पुणे, दि.५ (CTNN): गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त तरतूद यंदा अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी राज्य सरकारने केली आहे, त्याचा लाभ मुस्लीम समाजाने जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी भोसरीत व्यक्त केले. असून अल्पसंख्यांक समाजापैकी मुस्लीम समाजाचा शिक्षण नसल्यामुळे अपेक्षित विकास झाला नाही, सेही मत बापट यांनी यावेळी व्यक्त केले.

 

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहात आयोजित ईद मिलनकार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, राज्य कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी आदी उपस्थित होते.

 

बापट पुढे म्हणाले, की मानवतेतून मानवाचा विकास करावा, असाच संदेश सर्व धर्म देतात. मात्र, भारतीय राजकारणातील काही अपप्रवृत्ती समाजात वैयक्तिक स्वार्थासाठी वाद निर्माण करतात, अशा प्रवृत्तींना बाजूला सारले पाहिजे. व्यक्तिगत भांडणाला जातीयवादाचा तसेच धर्मवादाचा रंग देऊ नये. दिवाळी, ईद, नाताळ, गुरू नानकजयंती, महावीर जयंती असे सर्व सण सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन साजरा करण्याने एकात्मिकता वाढीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000025