विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी; उद्या पहिले लाक्षणिक भजनी आंदोलन
Friday, Jul 7 2017 12:35PM    CTNN
Tags: Vitthal temple committee, sacking of Vitthal temple committee, Demand for sacking of Vitthal temple committee, recruit of political people in temple committee, political people in temple committee, Warkari sect, Shri Vitthal-Rukmini Temple Committee, bandatatya kharadkar, protest of Legislative Asse 1000004848

पंढरपूर, दि.७ (CTNN): आषाढी वारीच्या पूर्व संधेला घोषित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये राजकीय लोकांचा भरणा अधिक असल्याचा व नियुक्त केलेल्या व्यक्तींचा वारकरी सांप्रदायाशी काडीचा संबंध नाही. तसेच अभक्ष भक्षण आणि अपेयपान करणारी मंडळी नेमून शासनाने वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याचे सांगत विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

नवनियुक्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी या मागणीसाठी काल शुक्रवार (दि.६) रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीस मानाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख, विविध वारकरी संघटनांचे अध्यक्ष आणि मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होती. शासनाने तात्काळ समिती बरखास्त न केल्यास विधान भवनावर मोर्चा काढू असा इशारा वारकरी सांप्रदयातील अर्ध्वयू संतवीर बंडातात्या कराडकर यांनी यावेळी दिला.

 

आषाढी वारीच्या पूर्व संधेला मुख्यमंत्र्यांनी भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची घोषणा केली. मात्र घोषित केलेल्या समितीत राजकीय लोकांचा भरणा अधिक असल्याचा व नियुक्त केलेल्या व्यक्तींचा वारकरी सांप्रदायाशी काडीचा संबंध नसल्याने अभक्ष भक्षण आणि अपेयपान करणारी मंडळी नेमून शासनाने वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याची मात यावेळी वारकरी सांप्रदायाकडून मांडण्यात आले.

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली समिती वारकरी संप्रदायाला मान्य नाही समिती तात्काळ बरखास्त न केल्यास तीन टप्प्यात आंदोलन करण्याची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली. पहिले आंदोलन येत्या उद्या शुक्रवार (दि.) जुलै रोजी श्री विठ्ठल मंदिरासमोरील संत नामदेव पायरी येथे लाक्षणिक भजनी आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरे आंदोलन श्रावण महिन्यातील एकादशीला केले जाणार आहे या भजन आंदोलनात राज्यभरातील वारकरी संप्रदाय सहभागी होतील. या दोन्ही आंदोलनाची शासनाने दखल न विधान भवनावर भव्य मार्च काढू असा निर्वाणीचा इशारा हभप कराडकर यांनी दिला.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130