शिर्डीच्या साईबाबांना २ किलो सोन्याच्या पादुकांचे दान
Saturday, Jul 8 2017 2:20PM    CTNN
Tags: shirdi sai baba, sai baba, Donations of 2 kg of gold footwear, 2 kg of gold footwear, Gurupornima festival, Gurupornima, Vitthal Darshan, Saibaba Institute 1000004870

आग्रा येथील गुप्ता दाम्पत्याने केले सुवर्णदान

 

शिर्डी, दि.८ (CTNN): शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे काकड आरतीने सुरुवात झाली असून गुरुपौर्णिमा उत्सावात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी आग्रा येथील गुप्ता दाम्पत्याने साईंना तब्बल २ किलो सोन्याच्या पादुकांचे दान केले आहे.

 

गुरुपोर्णिमा उत्साहानिमित्त साईबाबा संस्थानने उत्सवासाठी जय्यत तयारी केली असून, साईसमाधी मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई, चावडीला आकर्षक फुलांनी सजवले आहे. पुण्याहून निघालेली साई पालखी कालच साईनगरीत दाखल झाली आहे. तर इतर ठिकाणाहून निघालेल्या पालख्या आज दाखल होतील. साईनामाचा गजर, ढोल ताशाच्या निनादात वाजत-गाजत या पालख्या शिर्डीत दाखल होतात.

 

आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे विठ्ठल दर्शनाची वारकरऱ्यांना ओढ लागते, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेला साईदर्शनाची आस साईभक्तांमध्ये दिसून येते. साईबाबांना गुरुस्वरुप मानून असंख्य भाविक शिर्डीला जातात. पायी पालख्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. यावेळी अनेक भाविक आपल्या श्रद्धेने साईंना दान देत असतात.

 

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Ahmednagar,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000066