मशिदीत कुराण शिकविण्याच्या बहाण्याने वृद्धाने केले मुलींशी लैंगिक चाळे
Monday, Jul 10 2017 11:35AM    CTNN
Tags: Sexual practices with the girls to teach, teacher Sexual abuse in teaching, Sexual abuse in kuran teaching, Quran teachings, kuran teachings, Sexual abuse in quran teaching, Cardiff Crown Court, Mohammad Haji Siddiqui, 1000004882

आरोपीला १३ वर्षांचा कारावास

 

लंडन, दि.८ (CTNN): मशीद, मंदिर, शाळा व चर्च अश्या ठिकाणी भाविक श्रद्धेने येत असतात. मात्र ब्रिटनमधील एका मशिदीत कुराण शिकविण्याच्या बहाण्याने ८१ वर्षीय वृद्ध लहान मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ब्रिटन न्यायालयाने आरोपीला १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

मोहम्मद हाजी सिद्दीकी (वय ८१) यांच्यावर चार मुलींना चुकीच्या पद्दतीने स्पर्श केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मोहम्मद सिद्दीकी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना आपल्या जवळ बसवत आणि कुराण वाचायला सांगत असे. यावेळी विद्यार्थींनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. धक्कादायक म्हणजे हे सर्व तो इतर सर्व विद्यार्थ्यांसमोर करत असे.

 

हे सर्व गुन्हे १९९६ ते २००६ दरम्यान झाले असून कार्डिफ क्राऊन कोर्टाने याप्रकरणी सिद्दीकीची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुनावला. आरोप आहे की मोहम्मद सिद्दीकी आपल्यासोबत लोखंड आणि लाकडाची छडी ठेवत असे. शिकवत असताना अनेकदा तो विद्यार्थ्यांना मारहाण करत असे. सिद्धीकी गेल्या ३० वर्षांपासूनही जास्त काळापासून मशिदीत कुराण शिकवत होता. न्यायालयाने त्याला एकूण १४ आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. यामधील सहा प्रकरणे मुलांना मारण्यासंबंधीत असून, आठ प्रकरणे लैंगिक शोषणासंबंधी आहेत.

 

सिद्दीकीला कारावासाची शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटले की, याप्रकरणी तुझी वाईट बाजू आमच्यासमोर आली आहे. तू मुलांच्या पालकांचा विश्वासघात केला आहे. आपल्या मुलांना कुराण शिकता यावे यासाठी ते मुलांना तुझ्याकडे पाठवायचे'. तसेच न्यायालयाने चार मुलांनी पुढे येऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याने मुलांचे कौतुक केले आहे.

 

दरम्यान, मशिदीतील इतर सदस्यांनी मिळून आपल्याला या प्रकरणात गोवल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच आपल्यावर लावण्यात आलेले आरोप षडयंत्र असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे तपास होणार का? हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: london,   Country: United Kingdom,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000042