लोकमान्य टिळक नव्हे तर; श्रीमंत भाऊ रंगारीच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक
Thursday, Jul 13 2017 6:54PM    CTNN
Tags: Lokmanya Tilak, shreemant bhau rangari, shreemant bhau rangari trust, 125th year of Ganeshostava, pune ganeshostav, pune festival 1000004959

पुणे, दि.१३ (CTNN): पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊ रंगारी ट्रस्टने केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने उत्सवाचे १२६ वे वर्ष साजरे करावे, अशी मागणी श्रीमंत भाऊ रंगारी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

 

मागील वर्षी भाऊ रंगारी ट्रस्टने गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे केले. तर यंदा महापालिकेमार्फत १२५ वे गणेशोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांसमोर चुकीचा इतिहास येत असून स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोष महाराष्ट्र राज्य पश्चिम विभाग खंड नंबर ३ मधील अधिकृत नोंदीनुसार स्वातंत्र्य सैनिक भाऊ रंगारी उर्फ लक्ष्मण जावळे यांनी १८९२ ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाला व्यापक स्वरुप दिले. त्यामुळे गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी आहेत. त्यामुळे या उत्सवाला त्यांचे नाव देण्यात यावे. शिवाय त्यांचा पुतळा मंडई किंवा अलका चौकात बसवावा, अशी मागणी ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे.

 

दरम्यान, यापुढे चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडला गेला तर भविष्यात ट्रस्ट आक्रमक भुमिका घेईल शिवाय आंदोलनाचा मार्गही स्वीकारला जाईल, असे सदस्य सुरज रेणुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महापालिका याबाबत कोणती भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे. तत्पूर्वी यंदाच्या गणेशोत्सवाच्या आगमनाची तयारी जोरदारपणे चालल्याचे दिसून येत आहे.

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000066