सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकच; महापौर टिळक यांचे प्रतिउत्तर
Friday, Jul 14 2017 3:35PM    CTNN
Tags: Public Ganesh Festival, Ganesh Festival, Lokmanya Tilak, shreemant bhau rangari, shreemant bhau rangari trust, 125th year of Ganeshostava, pune ganeshostav, pune festival, shree bhau rangari ganpati trust, 1000004975

संदर्भ 'श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट'नेच तपासावेत असा टोला

 

पुणे, दि.१४ (CTNN): सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकच आहेत. त्याविषयीचे संदर्भ 'श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट'नेच तपासून पहावेत, असे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवार (दि.३) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊ रंगारी ट्रस्टने केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने उत्सवाचे १२६ वे वर्ष साजरे करावे, अशी मागणी श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्टकडून करण्यात आली होती.

 

मागील वर्षी भाऊ रंगारी ट्रस्टने गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे केले. तर यंदा महापालिकेमार्फत १२५ वे गणेशोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांसमोर चुकीचा इतिहास येत असून स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोष महाराष्ट्र राज्य पश्चिम विभाग खंड नंबर ३ मधील अधिकृत नोंदीनुसार स्वातंत्र्य सैनिक भाऊ रंगारी उर्फ लक्ष्मण जावळे यांनी १८९२ ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाला व्यापक स्वरुप दिले. त्यामुळे गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी आहेत. त्यामुळे या उत्सवाला त्यांचे नाव देण्यात यावे. शिवाय त्यांचा पुतळा मंडई किंवा अलका चौकात बसवावा, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

 

भाऊ रंगारींनीच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचे अनेक दाखले आहेत. याशिवाय राज्यसरकारनेही ते मान्य करून त्या विषयीचा अहवाल दिला आहे, असे असताना सार्वजनिक गणेशोत्सवाला मागील वर्षीच १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुन्हा १२५ वे वर्ष साजरे करण्याचे काहीच कारण नाही, असा युक्तीवाद करत महापौरांनीच हा वाद उकरून काढल्याचा आरोप 'श्री भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट'चे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता आणि खजिनदार अनंत कुसुरकर यांनी केला होता.

 

या संदर्भात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना आणि महापौरांनाही पत्र दिले आहे. तावडे यांना ट्विटरवरून, इमेलद्वारे कळवले आहे. तसेच मागील वर्षी आणि यावर्षी देखील या संबंधीचे सर्व पुरावे दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारनेच या संबंधीचे पत्र दिले आहे आणि सरकारच आता १२५ वे वर्ष साजरे करत आहे आणि त्यासाठी तरतूद केली आहे. जर सरकारने स्वत: दिलेले पत्र खोटे असेल तर सरकारनेच स्वत: चुकल्याचे सांगावे, अशी या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. तसेच यापुढे चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडला गेला तर भविष्यात ट्रस्ट आक्रमक भुमिका घेईल शिवाय आंदोलनाचा मार्गही स्वीकारला जाईल असेही सांगण्यात आले आहे.

 

दरम्यान, महापौर मुक्त टिळक यांनी हा विषय मान्य केला नसून ज. स. करंदीकर यांनी टिळकांवरील लिहिलेल्या पुस्तकातही लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचा संदर्भ आहे. इंग्रजी शिक्षण आणि बोलण्यात शिथिलता येत असल्याचे लक्षात आल्याने ती घालवण्यासाठी धर्माचा आधार घेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे महापौर म्हणाल्या आहेत.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
1000001270 ?????? ????? ?????   from  PUNE     Aug 13 2017 12:36PM
काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आणि स्वतःच स्वतःला विद्वान म्हणवून घेणाऱ्या बुद्धीजीवींकडून आजकाल ऐतिहासिक नेत्यांच्या बाबतीत समाजामध्ये चुकीचा संदेश जाणून-बुजून पसरवला जातो आहे. भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळक हे दोघेही थोर होते आणि भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सव सार्वजनिक रित्या सुरू केला हे जरी खरे मानले तरी त्यामुळे लोकमान्य टिळकांचे त्यात काहीही योगदान नव्हते किंवा नाही हे म्हणणे योग्य नाही. लोकमान्यांनी हीच सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना पूढे जनतेमध्ये नेऊन तिचा वापर जनतेमध्ये ब्रिटीशांविरुद्ध असंतोष जागृत करण्यासाठी आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक शस्त्र म्हणून केला हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. तेव्हा या गोष्टीवरून अनाठायी वाद उत्पन्न करणे कोणाच्याही हिताचे नाही. खरी गोष्ट अशी आहे की मोठमोठया ऐतिहासिक पुरुषांची नावे घेऊन, त्यांना जातीपातीच्या बेडीमध्ये अडकवून समाजात विष कालवण्याचा प्रयत्न सध्या जोरात सुरू आहे. वास्तविक सध्याच्या खुज्या, बुद्रुक, स्वार्थी, सत्तापिपासू, भ्रष्ट आणि बेंगरूळ लोकांनी ऐतिहासिक पुरुषांची नावे घ्यावी आणि असले घाणेरडे राजकारण करावे हेच मूळी चुकीचे आहे. गणेशोत्सवामध्ये पूढे आरत्या आणि मागे मटका, पूढे आरास आणि मागे दारूच्या बाटल्या, पूढे किर्तन आणि मागे तमाशा, मंडपात गणेश आणि बाहेर बिभीत्स-हिडीस गाणी आणि नृत्ये अशी दृष्ये बहुतेक गणेश मंडळांच्या सभोवती दिसतात आणि त्यात कोणालाही काही वावगे वाटत नाही. हे असेच सुरू राहिले तर इथून पूढे प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, ब्रम्हा, विष्णू, महेश, विठ्ठल, मारुती यांचीही धर्म-जातवार विभागणी होऊन समाजात विष कालवले जाईल अशी साधार भीती वाटते.  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000066