पुण्यातील रांजणगाव गणपती येथे तब्बल ४ टन गोमांस जप्त
Sunday, Jul 16 2017 5:17PM    CTNN
Tags: Beef seized, Beef, illegal Beef, illegal Beef selling, Beef transport, ranjangaon ganpati, All India Agricultural Seva Sangha, akhil bhartiy krushi go-seva sangh, ranjangaon police station, ranjangaon police, ranjangaon crime 1000005014

रांजणगाव, दि.१६ (CTNN): पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे आज रविवार (दि.१६) जुलै पहाटे तीनच्या सुमारास दोन वाहनांमधून चाललेले तब्बल चार टन गोमांस आखिल भारतीय कृषी गो सेवा संघाच्या सभासदांकडून पकडण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे पदाधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपींवर महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रांजणगाव गणपती येथे पहाटेच्या सुमारास गो-मास नेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आखिल भारतीय कृषी गो सेवा संघाच्या सभासदांनी (एमएच ०४ एचडी ५६३८) व दुसऱ्या एका टॅम्पोतून तब्बल ४ किलो गोमांस जप्त केले.

 

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात गो-मास पकडण्यात आल्याने कृषी गो सेवा संघाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. मात्र पकडलेली वाहने सभासदांकडूनकडून रांजणगाव पोलिस स्टेशनला आणण्यात आली आहेत. त्यानंतर मांसाची वैद्यकीय तपासणी करुन ते जप्त करण्यात आले.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130