‘भाऊसाहेब रंगारी’ची मुख्यमंत्र्यांसह आयुक्त आणि महापौरांना नोटीस
Tuesday, Jul 18 2017 2:00PM    CheckmateTimes
Tags: Public Ganesh Festival, Ganesh Festival, Lokmanya Tilak, shreemant bhau rangari, shreemant bhau rangari trust, 125th year of Ganeshostava, pune ganeshostav, pune festival, shree bhau rangari ganpati trust, rangari trust notice, cm notice, mayor notice, lokmanya tilak, bharu rangari, 1000005055

पुणे, दि.१८ (CTNN): गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या वादावरून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली आहे. मंडळाकडून मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांसह महापौर मुक्ता टिळक, पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे, गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक हे भाऊसाहेब रंगारी असून ब्रिटिशविरोधी लढ्यासाठी भाऊसाहेब रंगारी यांनी पुढाकार घेऊन १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. असा दावा मंडळाने केला आहे. दरम्यान हि संकल्पना लोकमान्य टिळकांना आवडल्याने टिळकांनी १९९४ वर्षापासून त्याचा प्रसार केला, असेही मंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे, सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १२५वे वर्ष नसून, १२६ वे वर्ष आहे.

 

दरम्यान, याबाबत अनेक पुरावे असतानाही पुणे महापालिका यंदा गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष म्हणून साजरे करण्याच्या तयारीत आहे. त्याला विरोध करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने महापालिकेच्या विरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेसह ट्रस्टने महापौर मुक्ता टिळक, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेतील सर्व विरोधी पक्ष नेते व गटनेते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनाही नोटीस बजावली आहे.9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000066