पंढरपुरात भागवत एकादशी नव्हे; तर गोंधळ एकादशी
Thursday, Jul 20 2017 5:43PM    CheckmateTimes
Tags: pandharpur, aashadhi ekadashi, bhagvat ekadashi, pandharpur Temple Committee, planning of the pandharpur temple committee, ekadashi problem, varkari problem 1000005101

नियोजन शून्य कारभारामुळे वारकरी पावसात

 

पंढरपूर, दि.२० (CTNN): भागवत एकादशीनिमित्ताने दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. मात्र यंदा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा जबरदस्त फटका लाखो वारकऱ्यांना बसल्याचे दिसून आले आहे.

 

पंढरपुरात सध्या २ लाख भाविक आहेत, ज्यांना पावसात उभे राहून दर्शनाची वाट बघावी लागली. वारकऱ्यांनी दर्शनासाठी रांग ही गोपाळपूरच्या रिद्धीसिद्धी मंदिरापर्यंत पोहचली आहे. दर्शन रांगेच्या सोईसाठी कासार घाटापर्यंत स्कायवॉक करण्यात आला आहे. मात्र स्कायवॉकनंतर या वारकऱ्यांसाठी कोणतीही सोय किंवा सुविधा केलेली नाही. दरम्यान, या परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला असून त्यामुळे वारकऱ्यांना पावसात उभे राहून दर्शनासाठी वाट बघावी लागत आहे.

 

आषाढी वारीनंतर येणाऱ्या या एकादशीला दरवर्षी मोठी गर्दी असते हे लक्षात घेऊन पंढरपूर पोलिसांनी मंदिर समितीला आषाढी वारीसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड काढू नयेत आणि त्याद्वारेच रांग नियंत्रित करावी अशी सूचना केली होती, मात्र समितीने आषाढवारी नंतर बॅरिकेट काढून टाकले. त्यामुळे रांग वाटेल तशी लागली आहे. रांगेत मध्येच घुसणाऱ्यांमुळे वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यातच पाऊस पडत असल्याने वारकरी हे हतबल झाले असून ते मंदिर समितीच्या नियोजनशुन्य कारभाराला शिव्याशाप देत आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pandharpur,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130