संततधार पावसासोबत श्री क्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा
Saturday, Jul 22 2017 1:30PM    CheckmateTimes
Tags: nrusinhwadi Datta Temple, South Gate Function, dakshinodvar sohla, jaysingpur, rain, datt temple 1000005145

जयसिंगपूर, दि.२२ (CTNN): श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त मंदिरात आज दुपारी पावणेचारच्या सुमारास दक्षिणद्वार सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी मंदिरात स्नानासाठी गर्दी केली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसाने शिरोळ तालुक्याच्या कुशीतून वाहणाऱया कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्या तडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे या नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

 

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत संततधार सुरू आहे. यामुळे शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी शिरोळ तालुक्यात सकाळपासूनच पावसाची रिपरीप सुरू होती. दुपारी पावसाने उघडीप दिली होती.

 

दरम्यान, सायंकाळी नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा संगमाजवळ नदीच्या पाण्याची पातळी ४३ फूट इतकी होती. अंकली पुलाजवळ २१ फूट, तर राजापूर बंधाऱयाजवळ ३१ फूट पातळी होती. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी तेरवाड बंधाऱयाजवळ ५४ फूट, शिरोळ बंधाऱयाजवळ ४४ फूट, तर कुरुंदवाड येथील दिनकरराव यादव पुलाजवळ ४३ फूट होती.

 

२४ तासात पंचगंगा नदीच्या पातळीत सात फुटांनी वाढ

शिरोळ तालुक्यात चारही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या २४ तासांत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सात फुटांनी वाढ झाली. बुधवारी रात्री उशीरा नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पाण्याची पातळी संथगतीने वाढत असल्याने गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता दक्षिणद्वार सोहळा झाला. यावेळी शेकडो भाविकांनी पादुकांवरून दक्षिण दरवाजातून बाहेर पडणाऱया पवित्र पाण्यात स्नान केले.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006