महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद
Saturday, Jul 29 2017 2:57PM    CheckmateTimes
Tags: Theft of jewelery in Mahalaxmi temple, pimpri Mahalaxmi temple, pimpri Mahalaxmi temple thief, Theft of jewelery, thief, jewelery in Mahalaxmi temple, pimpri crime, pimpri police, 1000005272

पुणे, दि.२८ (CTNN): पुण्यातील दत्तवाडी येथे असलेल्या म्हसोबा मंदिरातील देवाचे सोन्याचे डोळे चोरून नेण्याच्या घटनेबरोबरच जिल्ह्यात देवाच्या दागिन्यांची, मंदिराच्या कळसांची चोरी केल्याच्या अनेक घटना घडत असून पिंपरी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरट्याने देवीच्या गळ्यातल्या दागिन्यांवरच हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार (दि.२७) जुलैला मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असून सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीच्या गळ्यात सुमारे १७ ते १८ तोळे सोने असून २ ते तोळे सोने चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्याने नियोजन पूर्वक अवघ्या दोन मिनिटात हि चोरी केली.

 

चोरट्याने चेहरा दिसू नये यासाठी तोंड रुमालाने बांधलेले होते. तसेच इतरांना संशय येऊ नये यासाठी देवदर्शनाला आल्याच्या अविर्भावात त्याने घंटा वाजवले, मंदिराचे प्रवेशद्वार उघडले आणि मूर्तीच्या गळ्यातील दागिने घेऊन त्याने शांततेत बोपारा केला.

 

दरम्यान, पिंपरी पोलिसांनी परिसराची व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून लवकरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र तोंड रुमालाने झाकलेले असल्यामुळे चोरट्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130