वारकरी सांप्रदाय हिंन्दु धर्माचे सुधारीत रुप: किशोर कामठे
Saturday, Jul 29 2017 1:42PM    Checkmate Times
Tags: sant sampraday, maharashtra sant, kishor kamthe, varkari sampraday, hindu religious, sant namdev maharaj 1000005276

सर्व संतांच्या पुण्यतीथी एकत्र साजरी

 

पुणे, दि.२८ (CTNN): वारकरी सेवा संघाच्या उपक्रमा अंतर्गत सर्व संतांच्या पुण्यतीथी एकत्र साजरी करण्यात येते. समाजातील जातीचा तिढा नष्ट व्हाव्या यासाठी संत नामदेव महाराजांच्या पुण्यतीथी निमित्त वारकरी सेवा संघ व समस्त शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

 

यावेळी किशोर कामठे पाटील, अनंता देशमुख, मुकुंद पाटसकर, किरण कामठे पाटील हे प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांनी वारकरी सांप्रदायाचे महत्व नागरिकांना पटवून देत समाजातील तिढा दूर करण्यासाठी वारकरी सेवा संघातर्फे गेली ४ वर्ष सर्व संतांच्या पुण्यतीथी एकत्र साजरी करण्याचा उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.

 

यावेळी किशोर कामठे पाटील यांनी विचार मांडताना सांगीतले कि, आपल्या संतानी जे ७५० वर्षापूर्वी जे सांगुन ठेवले आहे. ते आज ही आपणा सर्वांना प्रेरीत करते, त्यांनी कुठल्याही जाती पातीला थारा दिला नाही. वारकरी सांप्रदायाकडे हिंन्दु धर्माचे सुधारीत रुप म्हणुन पाहिले जाते. मात्र आपण सर्वजण फार संकुचीत झालो आहोत. प्रत्येकाने आपल्या जाती प्रमाणे संताना वाटून घेतले आहे. म्हणुन आज गरज आहे सर्व समाजातील मंडळीनी एकत्र येऊन संताच्या पुण्यतीथी साजरी करायला हवी म्हणुन वारकरी सेवा संघाने गेली ४ वर्ष हा उपक्रम राबवत आहे

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006