श्रीमंत शिवनगरी गणेश मंडळाने केली चीनी वस्तूंची होळी
Wednesday, Aug 30 2017 6:34PM    CHECKMATE TIMES
Tags: china product burning, pune ganesh festival, shrimant shivnagari ganesh mandal, swadeshi, china go back, kotharud ganeshotsav, kothrud news 1000005533

पुणे, दि.३० (CTNN): गणेशोत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळे निरनिराळ्या विषयांवर देखावे सादर करत असताना, कोथरूड मधील श्रीमंत शिवनगरी गणेश मंडळाच्या वतीने “स्वदेशी अंगिकारू, चीन चे कंबरडे मोडु, सीमेवर जवान लढती, अंतरंग आम्ही सांभाळु” म्हणत, चीनी वस्तूंची होळी केली. यावेळी कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.

 

यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, १७ वर्षापासून कार्यरत असणारे श्रीमंत शिवनगरी गणेश मंडळ खरोखरच कौतुकास पात्र आहे. चीनच्या वस्तूंवर नागरिकांनीच बहिष्कार टाकत खऱ्या अर्थाने देशप्रेम दाखवले पाहिजे. चीन मध्ये आपण वापरत असलेले कोणतेही सोशल मिडियाचे साधन वापरत नाहीत. त्याला देशप्रेम म्हणायचे. आपल्या इथे मात्र तसे होताना दिसत नाही. प्रत्येक भारतीयाने स्वदेशीचा अंगीकार केला पाहिजे असेही कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.

 

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष लचित पारनाईक, शिवनगरी सोसायटीचे चेअरमन नितीन धामणे, दिनेश परदेशी, राहूल पवार, सागर गायकवाड, प्रतिक दुदुस्कर, प्रशांत भरम, नवनाथ थिटे, सचिन खराडे, चारुदत्त कुलकर्णी, समीर शिंदे, अमित पवार, अशिष करडीले यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले होते. यावेळी सोसायटी मधील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 10,   Business Category: NA   Similar News ID: 1000000066