उद्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून ‘मुलगी वाचवा’ रॅलीचे आयोजन
Thursday, Aug 31 2017 8:09PM    CHECKMATE TIMES
Tags: save girl child rally, national Tanner association, charmakar samaj pune, girls bike rally pune, pune ganeshotsav 1000005550

पुणे, दि.३१ (CTNN): राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे यांच्या वतीनेमुलगी वाचवा, मुलगी जगवा, मुलगी शिकवाया जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा अनेक गणपती मंडळांचे १२५ वर्ष आहे. याचेच अवचीत्य साधून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये १२५ मुली सहभागी होणार असून, त्याच्या हातात मुलगी वाचवा मुलगी जगवा, मुलगी शिकवाअसे विविध मुलींविषयी जनजागृती करणारे फलक असणार आहेत.

 

या रॅलीत नू.म.वि. प्रशालाकनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. ही रॅली उद्या शुक्रवार (दि.१) सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता, श्री. संत देवजीबाबा मंदिर, फडके हौद चौक येथून सुरु होणार असून, मनाचे पाच गणपती करणार आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक व राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे अध्यक्ष राजाभाऊ पोटे यांनी दिली.       

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000063