VIDEO भोंदू महाराजांची यादी जाहीर करणाऱ्या आखाडा परिषदेच्या विरोधात निदर्शने
Monday, Sep 18 2017 3:02PM    CHECKMATE TIMES
Tags: protest against akhada parishad, protest by hindu, protest in alandi, santbhumi, fake sant list 1000005654

संतभूमी आळंदी मध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या

 

पुणे, दि.१७ (CTNN): भोंदू महाराज म्हणून जगप्रसिद्ध संतांची यादी प्रसिद्ध करून अवहेलना केल्याबद्दल आखाडा परिषदेच्या विरोधात संतभूमी असलेल्या आळंदी मध्ये निदर्शने करण्यात आली.

 

यावेळी आखाडा परिषदचे स्वयंघोषित अध्यक्ष नरेन्द्रगिरि व महामंत्री हरिगिरि यांनी जाहिर केलेल्या तथाकथित यादिच्या निषेदार्थ विरोध प्रदर्शन करण्यात आले. आंदोलनमध्ये युवा सेवा संघचे कार्यकर्ते म्हणाले की, "संत श्री आसाराम बापुजींचा खट्ला अजूनही न्यायालयाच्या आधीन आहे. आखाडा परिषदेने न्यायालयाचा अवमान केला आहे. आपण स्वतःला न्यायालयच्या वर समजता का ? असा प्रश्न युवा सेवा संघाने केला.

 

परिषदचे वक्तव्य हे सामान्य जनतेचे दिशाभूल करणारे, भारतीय न्यायव्यस्थेचे अवमान करणारे व करोडो भक्तांचे भावना दुखावणारे असून, परिषेदेने आपले वक्तव्य मागे घेऊन जनतेची माफी मागावी अशी मागणी केली यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केली.

 

नरेंद्र गिरी यांच्या ‘आसाराम बापू गृहस्थ आहे, म्हणून त्यांचे नाव यादीत टाकण्यात आले’, या वक्तव्यावर युवा सेवा संघाने ‘ज्या सप्त ऋषीमुनीचे वंश म्हणून आपण जगतो, ते देखील गृहस्थ होते. मग परिषद त्यांनाही संत मनात नाही का?’ असा सवाल आखाडा परिषदेला केला आहे. उद्या आखाडा परिषद संत तुकाराम देखील संत नव्हते असे जाहीर करेल, हे आम्ही खपवून घेणार नसून, आखाडा परिषदेने आपले शब्द आणि यादी मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

54   
0
प्रतिक्रिया
1000001372 Rahul   from  Pune     Sep 18 2017 8:02PM
Akhada parishad Khud fargi lagti hai.inko Sant samaj me nahi aa rahe hai  
  2     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Alandi,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130