वारजेत नवरात्रीनिमित्त घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत होते दुर्गामाता दौड’चे आयोजन
Thursday, Sep 21 2017 4:52PM    CHECKMATE TIMES
Tags: durgamata daud, shivpratishthan hindusthan, sambhajirao bhide guruji, warje navratri, pune navratra 1000005680

संभाजीराव भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून तरुणांचे एकीकरण

वारजेतील दौड’चे तिसरे वर्ष

 

पुणे, दि.२१ (CTNN): महाराष्ट्रासह देशभरात शारदीय नवरात्रीला उत्साहात सुरवात झाली असून, वारजेत नवरात्रीनिमित्त दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. वारजे परिसरातून निघणार्या या दुर्गामाता दौडचे हे तिसरे वर्ष आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून काढण्यात येत असलेल्या या दौडला संभाजीराव भिडे गुरुजींची प्रेरणा लाभली आहे. दिवसेंदिवस यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ होते आहे.

 

घटस्थापना ते दसरा या दरम्यान दहा दिवस वारजे विभागातील देवींचे मंदिरे व मंडळांमध्ये प्रतिष्ठापना केलेल्या देवींच्या दर्शनासाठी पहाटे सहा वाजता वारजे विभागातील युवक वारजे माळवाडी बसस्टॉप या ठिकाणी एकत्रित होतात. त्यानंतर भगव्या ध्वजाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करत, ध्येय मंत्र घेऊन दौड काढली जाते. दौडीत सामूहिकरित्या देवीच्या घोषणा, शिवछत्रपतींच्या घोषणा आणि देशभक्ती धर्मभक्ती गिते म्हणत ठरलेल्या विभागातील देवीच्या दर्शन घेतले जाते व प्रेरणा मंत्र म्हणून दौडीचा समारोप केला जातो.

 

दौड काढण्या मागील उद्देश असा आहे कि, राजमाता जिजाऊंनीही प्रतिवर्ष नवरात्र बसविले असेल पण त्यांनी, तुळजाभवानी जवळ स्वतःच्या संसारासाठी नव्हे वा भोसले वंशासाठी नव्हे तर, कन्याकुमारी ते काश्मीर पसरलेला भारतमातेचा उध्वस्त संसार दुरुस्त करण्यासाठी आशिर्वाद मागितले असतील. भोसल्यांच्या घरातील नवरात्र हे त्यांच्या कुटुंबासाठी नव्हते, तर साऱ्या हिंदु समाजाच्या संसारासाठी होते.

 

आपणही राजमाता जिजाऊंच्या व श्री शिवछत्रपतिंचा तोच उदात्त भाव अंतःकरणात धारण करुन, प्रत्येक वर्षी नवरात्रात दुर्गामातेच्या पायाशी साऱ्या भारतमातेच्या उध्वस्त होत चाललेल्या संसाराला दुरुस्त करण्यासाठी, आशिर्वाद मागण्याची प्रथा पत्करली पाहिजे. त्यासाठी या दौडचे आयोजन करण्यात येते. तर वारजे माळवाडी आणि परिसरातील तरुणांनी देखील यात उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

श्री शिवछत्रपतींच्या उण्यापुऱ्या ५० वर्षाच्या आयुष्यात त्यांनी देव, देश, धर्म यासाठी मुघल, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज या परकीय सत्ताधिशांशी शेकडो रणसंग्राम केले. क्षणाचाही विसावा न घेता हिंदूधर्म व हिंदु समाजासाठी शिवछत्रपति अखंड दौडले, लढले, झगडले. त्यांच्या रक्तातील आग, रग, धग, लढाऊपणा आजच्या तरुणपिढीच्या रक्तात येणे अत्यंत आवश्यक आहे. हा हेतू उराशी बाळगून “श्री दुर्गामाता दौड” श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी चालू केली. संपूर्ण महाराष्ट्र भर विविध जिल्ह्यात विविध तालुक्यात व गावात श्री दुर्गामता दौड काढली जाते. 

 

18   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000066