पुण्यात दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडून ४१ हजारांवर चोरट्यांचा डल्ला
Saturday, Sep 23 2017 6:05PM    CHECKMATE TIMES
Tags: temples cash box, thief of temple, cash box broker, hadapasar police, faraskhana police, aai mata temple hadapasar, lalbahadur tarun mandal ravivar peth, thief, pune 1000005691

पुणे, दि.२३ (CTNN): पुण्यात दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार ५०० रुपयांच्या रोख रकमेवर डल्ला मारला आहे. याबाबत फरासखाना आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील लालबहादूर तरुण मंडळाचे गणपती मंदिर कुलूप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करत, मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील १ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला. याबाबत अशोक जैन (वय.५९ रा.शुक्रवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. जाधव पुढील तपास करत आहेत.

 

तर दुसऱ्या घटनेत हडपसर येथील काळेपडळ परिसरातील आईमाता मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी नेनाराम चौधरी (वय ५५, रा.हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आदलिंग तपास करत आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130