कोजागरी निमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या लाखो भाविकांना होतेय अन्नदान
Saturday, Sep 30 2017 9:25PM    CHECKMATE TIMES
Tags: free lunch, lunch to pilgrims, walking pilgrims, tuljapur yatra, kojagari pornima, sp group solapur, akhail bharatiya sena, loknete subhash anna patil yuva manch 1000005725

एसपी ग्रुप, लोकनेते सुभाष पाटील युवा मंच आणि आखिल भारतीय सेनेचा उपक्रम

 

सोलापूर, दि.३० (CTNN): दरवर्षी नवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरात मोठ मोठे उत्सव साजरे होत असतात. मात्र नवरात्री नंतर कोजागरी पौर्णिमेला तुळजापूर यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक सोलापूर ते तुळजापूर पायी चालत जातात. अशा भाविक भक्तांना सोलापूर मधील सामाजिक संघटना एसपी ग्रुप, सुभाष पाटील युवा मंच आणि आखिल भारतीय सेनेच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षांपासून मोफत अन्नदान उपक्रम राबवण्यात येतो आहे.

 

याबाबत सुभाष पाटील युवा मंच’चे अध्यक्ष प्रशांत माने यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. तुळजापूरच्या या सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून देखील मोठ्या संख्येने भक्तगण येत असतात. त्यांचा हा पायी प्रवास सुखकर व्हावा म्हणून अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात येतो. त्यात प्रामुख्याने जेवणासह फळे आणि शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे देखील वाटप करण्यात येते. यावर्षी हा सोहळा गुरुवार (दि.५) ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी, हिप्परगी गावाच्या हद्दीत राबवण्यात येणार आहे. त्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

दिवंगत सुभाष पाटील हे हा उपक्रम राबवत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर हा वारसा २०१४ पासून एसपी ग्रुपचे संस्थापक नरेंद्र गायकवाड, सचिन सावंत आणि अखिल भारतीय सेनेचे प्रशांत माने हे राबवत आहेत. तर श्वासात श्वास असेपर्यंत हा उपक्रम सुरु राहील असेही माने यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी आबा कांबळे, प्रीतम जाधव, सुनीत मेहता, हेमंत शेडगे, अमोल धावडे, प्रशांत सरवदे, बालाजी बल्ला, राजा भंडारी, प्रज्वल पवार, रोहन शिंदे, रघु घाटोळे, विशाल कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यशस्वी करण्यासाठी कष्ट घेत असल्याचे माने यांनी सांगितले आहे.

 

 

63   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Solapur,   Country: India,
News Category: SocialWork,   Business Category: NA   Similar News ID: 1000000031