भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबाने महिलेची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम केली लंपास
Friday, Oct 13 2017 8:05PM    CHECKMATE TIMES
Tags: baba abuse, fraud baba, fake baba, Predictor, frauds in predictions, vishrambaugh police, vastushastra frauds 1000005788

पुण्यातील घटना

 

पुणे, दि.१३ (CTNN): भोंदू बाबांच्या फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येत असूनही, अजूनही लोक अशा भोंदू बाबांना फासत असल्याचे एक एक घटनांतून समोर येते आहे. अशीच एक घटना शहराच्या मध्यवस्तीत घडली असून, एका महिलेला भुरळ पाडून भोंदू बाबाने त्या महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी आणि ९ हजार रुपये लंपास केले आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील महिलेच्या पतीने त्यांच्या घरातील समस्या आणि भविष्य सांगण्यासाठी, घरातील अडचणी दूर करून सुख मिळवण्यासाठी काल गुरुवार (दि.१२) सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान एका अनोळखी बाबाला घरी बोलावले होते. दरम्यान सदरील ५६ वर्षे वय असलेल्या महिलेला त्या भोंदू बाबाने भुरळ पाडून तिच्या हातातील सोन्याची अंगठी आणि ९ हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला.

 

याबाबत उभयतांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तडक विश्रामबाग पोलीस स्टेशन गाठत त्या भोंदू बाबा विरुद्ध तक्रार दिली आहे. तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.

 

36   
1
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 15,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130