देवी रुक्मिणीच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी; गरुड खांबाचा पत्राही चोरला
Friday, Dec 22 2017 7:35PM    checkmate times
Tags: vitthal rukmini temple, godess rukmini chain theft, garud poll, silver theft from temple, mangasutra theft, godess thief, kudaje vitthal mandir, uttamnagar police 1000005941

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

 

पुणे, दि.२२ (चेकमेट टाईम्स): पुणे शहरासह अनेक मोठ्या शहरातील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिने हिसका मारून चोरी करून नेण्याच्या घटना नित्याच्याच असताना, इथे चक्क विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून, रुक्मिणी देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मंदिराच्या गरुड खांबाचा पत्रा देखील चोरून नेण्याचे धाडस चोरट्याने दाखवले आहे. याबाबत उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, ग्रामस्थ मात्र या घटनेने संतप्त झाले आहेत.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या जवळ, सिंहगडाच्या कुशीत असलेल्या कुडजे गावातील सर्वाचे आराध्य असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर बुधवार (दि.२०) रात्री १० वाजता बंद केल्यानंतर गुरुवार (दि.२१) पहाटे ५ वाजता नित्यपूजेसाठी उघडले असता, लोखंडी ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी कापलेले आढळून आले. तर मंदिरात पाहिले असता, मंदिरातील गरुड खांबाचा चांदीचा पत्रा जागेवर नसल्याचे आढळून आले. तर त्यानंतर देवी रुक्मिणीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र देखील जागेवर नसल्याचे आढळून आले.

 

याबाबत समीर पायगुडे (वय.३२ रा.कुडजे गाव, ता.हवेली, जि.पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक डी. एम. कोल्हे तपास करत आहेत. गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या भैरवनाथ मंदिराचे सद्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. त्यामुळे गावात बाहेरील नागरिकांचे येणे जाणे वाढले आहे. मंदिरात सीसीटीव्ही नसून, सदरील कृत्य कोणीतरी पाळत ठेऊन केले असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे कोल्हे यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130