प्रेम व सहनशीलतेच्या भावनेतून सकारात्मक परिवर्तनाकडे पाऊल टाका
Monday, Jan 8 2018 3:27PM    checkmate times
Tags: sant nirankari mission, mata savinder ji message, new year message, new year greetings, religious greetings on new year, ek tu hi nirankar 1000005960

निरंकारी सद्गुरु माता सविन्दर हरदेवजी यांचा नववर्ष संदेश

 

दिल्ली, दि.५ (चेकमेट टाईम्स): नववर्ष २०१८ चे स्वागत करत असताना एकमेकांशी प्रेम, सहनशीलता व आदरपूर्ण वागणूकरुपी भेटवस्तू देऊन जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प करुया. आपला पूर्वीचा नकारात्मक स्वभाव सोडून देऊन सकारात्मक भावनांनी युक्त होऊन या नववर्षात पाऊल टाकु या. असा संदेश निरंकारी सद्गुरु माता सविन्दर हरदेवजी महाराज यांनी नुतन वर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ मानवतेला व विशेषत: संत निरंकारी मिशनच्या अनुयायांना दिला.

 

सद्गुरु माताजींनी सांगितले की, नुतन वर्षानिमित्त आपण एकमेकांना भेटवस्तू व शुभकामनांचे आदान प्रदान करतो; परंतु प्रेम, सहनशीलता आणि आदर-सत्काराचा भाव हीच सर्वोत्तम भेटवस्तू ठरावी असा संकल्प निश्चितपणे जीवनामध्ये एक चांगले परिवर्तन घडवून आणेल. जोपर्यंत आपण आपली काम करण्याची पद्धत, बोलण्याची रीत बदलत नाही तोपर्यंत सकारात्मक परिवर्तनाची अपेक्षा कशी बाळगता येईल? सकारात्मक परिवर्तनाचा हा संकल्प केवळ एका दिवसापूरता मर्यादित राहू नये, तर अशा भावना सदोदित कायम रहाव्यात.

 

सद्गुरु माताजींनी सर्वांना शुभेच्छा देताना म्हटले की, निरंकार प्रभूने सर्वांना अशी सुमती द्यावी ज्यायोगे माणूस माणसाच्या उपयोगी पडावा आणि स्वत:बरोबरच इतरांच्या आनंदाला कारणीभूत ठरावा. आपल्या भक्तांसाठी प्रार्थना करताना त्यांनी नववर्षांमध्ये सर्वांना सेवा, सत्संग व नामस्मरणाची दृढता लाभावी अशी प्रार्थना केली.

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: delhi,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006