'संत निरंकारी मिशन' चा आध्यात्मिक सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Friday, Mar 9 2018 6:46PM    CHECKMATE TIMES
Tags: sant nirankari mission, sant nirankari satsang bhavan bhosri, bhosri, international women day, nirmal manchanda, sant nirankari charitable foundation 1000006153

पुणे दि.९ (चेकमेट टाइम्स): सदगुरू माता सविंदर हरदेवजी यांच्या असिम कृपा आशीर्वादाने 'जागतिक महिला दिन' चे औचित्य साधून ८ मार्च २०१८ गुरुवार रोजी सायंकाळी ६:३० ते ८:३०  या वेळेत विशाल आध्यात्मिक सत्संग सोहळा संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाला भोसरी सेक्टर मधून चाकण, खेड, शिक्रापूर येथून १५०० हुन अधिक भक्त उपस्थित होते. आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर स्वतः:ची प्रगती साधतानाच आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला पुढे नेण्याचा वसा चालविणाऱ्या नारीशक्ती चा सन्मान करण्यासाठी या सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमात आपले विचार 'निर्मल मनचंदा जी (केंद्रीय प्रचारक, दिल्ली)' यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या विचारांमधून नारी शक्ती चे महत्व पटवून दिले. सद्गुरूंच्या शिष्याची लक्षणे त्यांनी सांगितली. सद्गुरूंचा शिष्य हा नेहमी त्यांचे स्मरण करीत असतो, तो शांत तर असतोच परंतु जो कोणी त्यांच्या जवळ येतो त्यालाही शांत बनवण्याचं कार्य करीत असतो. जेव्हा एक स्त्री आध्यात्मिक सत्संग ला जोडली जाते तेव्हा ती सुसंस्कारित होऊन संपूर्ण पिढी सुधरवण्याचे महान कार्य करीत असते असा मोलाचा संदेश त्यांनी पोहोचवला. 'संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन' द्वारा महिला सबलीकरणासाठी शिवणकाम तसेच संगणक प्रशिक्षण यासारख्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.

 

संत निरंकारी मिशन मध्ये 'प.पु.आ.निरंकारी राजमाता कुलवंत कौर जी' यांनी महिला सबलीकरणासाठी नारी सत्संग ची सुरवात केली होती. एका स्त्रीला घर सांभाळत असताना विविध नाती जपावी लागतात. हि नाती जपण्याची कला सत्संग मधून शिकायला मिळते. आज नारी शक्तीच्या रूपाने प.पु.आ.सदगुरु माता सविंदर हरदेव जी महाराज आध्यात्मिक शिकवण जन माणसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला गाडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला भोसरी सेक्टर मधील सर्व ब्रांच चे मुखी, सेवादल अधिकारी, प्रबंधक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी केले.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000008