साईबाबांची आरती करून महिला दिन साजरा
Saturday, Mar 10 2018 4:52PM    CHECKMATE TIMES
Tags: Interntional women day, hanuman nagar, sangita marne, ashwini jadhav, vaishali marathe, sai baba, sai baba arti, 1000006160

पुणे दि.१० (चेकमेट टाईम्स): ‘जागतिक महिला दिन’ सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामजिक उपक्रम तसेच महिलांसाठी निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘हनुमान नगर’ येथील साईनाथ मित्र मंडळ व कोकण रहिवासी संघाच्या वतीने साईबाबांची आरती मुळशी विभागातील भोडे गावच्या सरपंच संगीता मारणे यांच्या हस्ते करण्यात आली.


यावेळी दिपाली जाधव म्हणाल्या, “महिलां वरील अत्याचाराच्या वाढत्या प्रमाणामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी स्वतःच सिद्ध होण्याखेरीज दुसरा पर्याय राहिलेला नाही. शारीरिक तंदुरुस्ती साठी पोषक आहार व नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.”


गुरुवार (दि.८) मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेविका वैशाली मराठे, डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक दिपाली जाधवकोकणवासीय महासंघ पुणे शहराच्या अध्यक्षा राजेश्री शिर्के, महासंघाच्या उपाध्यक्षा रुपाली नेवदेकर, पधादिकारी निलीमा चाळके, अलका दळवी, कोकण रहिवासी संघाच्या महिला अध्यक्षा सुरेखा यादव उपस्थित होत्या. या प्रसंगी सामाजिकशैक्षणिक,सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रामधे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उपस्थित सर्व महिलांचा सत्कार नगरसेविका अश्विनी जाधव यांनी पुष्पगुच्छ व पेढा देऊन केला.


कोकणवासीय महासंघ पुणे शहराचे अध्यक्ष तुकाराम जाधव, कोकणवासीय महासंघ कोथरूड विभागाचे अध्यक्ष संतोष अनिवसे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मराठे, धनंजय मारणे, मंडळाचे अध्यक्ष शंकर जाधव, संघाचे अध्यक्ष अशोक यादव व हनुमान नगर मधील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहिवासी संघाचे कार्याध्यक्ष श्रीराम जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम महेंद्र चाळके यांनी पार पाडले.

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 11,   Business Category: NA   Similar News ID: 1000000008