अंबाबाई मंदिरात बहुजन पुजारी नेमावेत
Tuesday, Mar 13 2018 6:01PM    CHECKMATE TIMES
Tags: ambabai temple kolhapur, ganmata ambabai mukti andolan, balgandharv rang mandir, avedik asmita parishad, b g kolse, 1000006178

'गणमाता अंबाबाई मुक्ती' आंदोलनाची मागणीपुणे दि.१३ (चेकमेट टाइम्स): कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी. या मंदिरातील पुजाऱ्यांच्या नेमणूकी वरून आता वाद पेटण्याची चिन्हे आहेत. कारण ब्राह्मण पुजाऱ्यांना हटवून सर्व जातीतील लोकांना पुजारी म्हणून नियुक्त करावे अशी मागणी 'गणमाता अंबाबाई मुक्ती' आंदोलनच्या वतीने करण्यात आली आहे.'पुणे श्रमिक पत्रकार संघ' आयोजित पत्रकार परिषदेत संपत देसाई म्हणाले, "कोल्हापूरच्या अंबाबाईसह महाराष्ट्रातील बहुजनांच्या अनेक कुलस्वामिनींचे ब्राह्मणीकरण वेगाने सुरु आहे. या मूल समतावादी परंपरा तोडून ज्यांचा कुलस्वामिनिशी काहीही संबंध नाही अशा पुजाऱ्यांना हटवून तिथे महिला पुजारी नेमावी अशी आमची मागणी आहे." या पत्रकार परिषदेला निर्ज धुमाळ उपस्थित होते.देसाई पुढे म्हणाले, "पंढरपूर कायद्याप्रमाणे अंबाबाई मंदिर कायदा तातडीने बनविला पाहिजे. वंश श्रेष्ठत्वाच्या आधारे पुजारीपण बळकविलेल्या पुजाऱ्यांना हटवून त्याजागी सर्व जातीतील सरकारी पुजाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच प्राधान्याने स्त्री पुजाऱ्यांची नियुक्ती झाली पाहिजे. या सर्व मागण्यांसाठी येत्या ७ एप्रिल ला 'बालगंधर्व रंगमंदिर' येथे सकाळी ११.३० ला 'अवैदिक अस्मिता परिषद', गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलनाच्या वतीने घेण्यात येणार आहे. या परिषदेला डॉ. आ. ह. साळुंखे हे अध्यक्ष पद भूषविणार आहेत तसेच डॉ. भारत पाटणकर,  न्या.बी.जी.कोळसे, पुरुषोत्तम खेडेकर, संध्या नरे-पवार, सुभाष देसाई हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006