सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन
Thursday, Mar 15 2018 1:53PM    CHECKMATE TIMES
Tags: sindhu sewa dal, chetichand mahotsav, bhagwan sai zulelal, mahatma gandhi road, sindhi community, sindhi new year, queens garden road, residency club pune, council hall pune, live concert, generation next dance academy 1000006196

भगवान साई झुलेलाल यांचा १०६७ वा जन्मोत्सव


पुणे दि.१५ (चेकमेट टाइम्स): सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०६७ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि.१८ मार्च) व सोमवारी (दि.१९ मार्च) हा महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या प्रसंगी सिंधू सेवा दलाचे सचिव सचिन तलरेजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विनोद रोहानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

दीपक वाधवानी म्हणाले, “रविवारी (दि.१८ मार्च) भगवान साई झुलेलाल यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा निघणार आहे. ही रथयात्रा पद्मजी कंपाऊंड येथील सिंधू सेवा दलाच्या कार्यालयापासून सायंकाळी ०५.३० वाजता निघेल. महात्मा गांधी रस्त्याने ही रथयात्रा जाणार आहे. तर सोमवारी (१९ मार्च) सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. हा महोत्सव अल्पबचत भवन, क्वीन्स गार्डन रोड, रेसिडेन्सी क्लबजवळ, कौन्सिल हॉल, पुणे येथे होणार आहे. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून संध्याकाळी ०७:०० वाजता सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. 'जनरेशन नेक्स्ट डान्स अॅकॅडमी' तर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि 'जतिन उदासी' व सहकार्‍यांचा 'लाईव्ह कॉन्सर्ट' यावेळी होणार आहे. त्यानंतर प्रीतीभोज (महाप्रसाद) कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ४००० पेक्षा अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील.

 

या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना वाधवानी म्हणाले, "प्रमुख पाहुण्या म्हणून 'मुकुल माधव फाउंडेशन' च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया उपस्थित असणार आहेत. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल ओय फौंडेशनच्या संस्थापक सिमरन जेठवानी, क्रिप्स फौंडेशनचे मनोहर फेरवानी, ईश्वर कृपलानी यांचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली २९ वर्ष कार्यरत आहे.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006