संभाजी महाराजांना वंदन करण्यासाठी ‘वढू’ येथे प्रचंड गर्दी
Saturday, Mar 17 2018 6:12PM    CHECKMATE TIMES
Tags: Sambhaji maharaj, wadhu, tulapur, sambhaji maharaj death anniversary, vinod tawde, baburao pacharne, shivajirao adhalrao patil, dharmaveer sambhaji maharaj smruti samiti, 1000006215

पुणे दि.१७ (चेकमेट टाइम्स): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त राज्यभरातून आलेल्या शंभू भक्तांनी आज श्री क्षेत्र वढूयेथे नतमस्तक होत महाराजांना अभिवादन केले. आज संभाजी महाराजांचा ३२९ वा बलिदान दिन असून वढूयेथे अलोट गर्दी जमली होती.

 

वढू ग्रामपंचायत आणि धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आज सकाळी शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी राज्याचे क्रिडा मंत्री विनोद तावडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे उपस्थित होते.

 

सकाळी संभाजी महाराजांच्या स्मृती स्थळावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शंभू भक्तांनी अलोट गर्दी केली होती. त्याचबरोबर वारकरी दिंड्यांनी सुद्धा नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. यावेळी संभाजी महाराज की जयअशा घोषणेने आसमंत दुमदुमून गेला.

 

यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणालेवढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकार हवा तितका निधी खर्च करेल. तसेच शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांचे धडे सुद्धा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

 


0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000089