मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने नूरजहाँ यांना 'समाज प्रबोधन पुरस्कार'
Thursday, Mar 22 2018 12:57PM    CHECKMATE TIMES
Tags: hamid dalwai, muslim satyashodhak mandal, muslim truth seeking society, triple talaq, nasruddin shah, samaj prabodhan puraskar, 1000006254

पुणे दि.२२ (चेकमेट टाइम्स): मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, नूरजहाँ साफिया नियाज, वकील बालाजी श्रीनिवासन, शमसुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते. यावेळी नूरजहाँ यांना 'समाज प्रबोधन पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.


 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणात जेष्ठ अभिनेते नसारूद्दीन शाह म्हणाले की, "हमीद दलवाई यांचे विचार आजही लागू आहेत. अभिनेते बऱ्याचदा दुसऱ्याचे विचार लोकांपर्यंत पोचवतात. त्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी खूप कमी मिळते. मी हमीद दलवाई यांच्या मुस्लिम धर्म सुधारणेच्या विचारांशी सहमत असून त्याचे विचार आजही समाजासाठी लागू आहेत."


 

हमीद दलवाई यांच्या कार्याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले, "मी दलवाई यांच्याविषयी खूप ऐकलं आणि वाचलं आहे. सध्या मी त्यांच्या कुंटुबासोबत संपर्कात आहे आणि हमीद दलवाई यांच्यावरील एका डॉक्युमेंटरी मध्ये माझं काम चालू आहे."


 

हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० रोजी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्यांनी मुस्लीम महिलांसाठी खूप कार्य केले. तिहेरी तलाक आणि मुस्लीम महिलांचे हक्क यांसाठी त्यांनी मुंबईत काढलेला मोर्चा खूपच चर्चेचा ठरला. ३ मे १९७७ रोजी त्यांचे किडनी च्या आजाराने निधन झाले.


छायाचित्र : सकाळ टाइम्स


0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006