'अंनिस' कडून 'सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा' समर्थनार्थ स्वागत परिषद
Friday, Mar 23 2018 7:33PM    CHECKMATE TIMES
Tags: narendra dabholkar, maharashtr andhshraddha nirmoolan samiti, mumbai, yashwantrao chavan pratishthan, devendra fadanvis, nilam gorhe, ramraje nimbalkar, prithviraj chavan, avinash patil 1000006278

पुणे दि.२३ (चेकमेट टाइम्स): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जातपंचायती च्या मनमानी विरोधात सक्षम कायद्याची मागणी वारंवार केली जात होती. याची दखल घेत सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर केला. याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. या कायद्याची स्वागत परिषद मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत होणार आहे.

 

 

या परिषदेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आमदार नीलम गोऱ्हे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

महाराष्ट्र 'अंनिस' ने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जातपंचायत मूठमाती अभियान सुरू केले. या अभियानामुळे सुन्न झालेल्या व्यवस्थापने समोर अनेक जातपंचायतीच्या मनमानी कारभाराची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. 
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Mumbai,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006