कोथरूडमध्ये रामनवमी उत्साहात साजरी
Monday, Mar 26 2018 11:36AM    CHECKMATE TIMES
Tags: lord rama, lord rama birth function, ram navami, kothrud, pune, modak ram mandir, shivtirth nagar, kothrud ram navami programme, 1000006290

रामजन्मसोहळा आणि सामुदायिक रामरक्षा पठण सोहळ्याची समाप्ती

 


​पुणे दि.२६ (चेकमेट टाइम्स): प्रभू श्रीराम जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातही अनेक ठिकाणी रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोडक राममंदिर (शिवतीर्थनगर, कोथरुड) येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

मोडक राममंदिर येथे रामजन्म सोहळा ​साजरा करण्यात आला. त्याचबरोबर महिलां​च्या ​सामुदायिक रामरक्षा पठण सोहळ्याची समाप्ती ​झाली. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात नियमित रामरक्षा पठण करण्यात येत होते. या पठणाची समाप्ती आज करण्यात आली. तसेच किर्तन सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता.

 

 

मोडक राममंदिर येथे अतिशय उत्साहात आणि आणि भक्ती भावाने या सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. तसेच सोहळ्याचे हे १५ वे वर्ष होते.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 11,   Business Category: NA   Similar News ID: 1000000089