तुळशीबागेतील राममंदिरात रामनवमी उत्साहात साजरी
Monday, Mar 26 2018 2:12PM    CHECKMATE TIMES
Tags: pune, tulshibag, tulshibag ram temple, lord ram, ram nawmi festival, lord ram birth festival, lord ram idol tulshibag, 1000006296

पुणे दि.२६ (चेकमेट टाइम्स): संपूर्ण देशभर रामनवमीचा उत्सव अतिशय उत्साहात पार पडला. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन, रामकथा वाचन तसेच महाप्रसाद अशा अतिशय भक्तिमय वातावरणात रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. पुण्यातील तुळशीबागेतील ऐतिहासिक राममंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

 

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. तुळशीबागेतील राम मंदिर ही त्यांपैकीच एक वास्तू असून या वास्तूला खूप महत्व आहे. रामनवमी निमित्त राममंदिरात परंपरेप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.    

 

 

सकाळी दहाच्या सुमारास किर्तन सुरु करण्यात आले. त्यानतंर दुपारी बारा वाजता 'श्रीराम जय राम जय जय राम' च्या गजरात रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या जन्मोत्सवानंतर मंदिर परिसरात सुटवडयाचे वाटप करण्यात आले.

 

 

तुळशीबागेतील राम मंदिराचे बांधकाम १७६१ मधे करण्यात आले असून उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. श्रीराम, लक्ष्मण व सीता या तिन्ही मूर्ती पांढर्‍या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या, जटायुक्त व धनुर्धारी आहेत. सीतेच्या एका हातात कमळ असून दुसर्‍या हातात कलश आहे. तिनही मूर्ती संगमरवरी असून अतिशय नाजूक, रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. १७६७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्ती उमाजी बाबा पंढरपूरकर यांच्याकडून करवून घेतल्याची नोंद आढळते.
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Cultural,   Business Category: NA   Similar News ID: 1000000089