संत निरंकारी मिशन चा 'नारी समागम सत्संग सोहळा' संपन्न
Tuesday, Mar 27 2018 1:42PM    CHECKMATE TIMES
Tags: pune, sant nirankari mission, savindar hardevji maharaj, sant nirankari satsang bhavan, gangadham, marketyard, nari samagam satsang sohla, b j medical college, 1000006302

पुणे दि.२७ (चेकमेट टाइम्स): सदगुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने २५ मार्च २०१८ रविवार रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत पुणे झोनचा 'नारी समागम सत्संग सोहळा' संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम, मार्केटयार्ड, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे झोन मधून ३५०० हुन अधिक महिला भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व वयोगटांतील स्त्रियांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.

 

 

या कार्यक्रमात "प.पु. बहन राज जी" (दिल्ली) ज्यांना संत निरंकारी मिशन मध्ये "राज मामी जी" या नावाने ओळखले जाते त्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, "आज मानवाला परमात्मा ची ओळख करून घेण्यासाठी सर्वप्रथम सदगुरु ला शरण येण्याची गरज आहे. जीवनात सदगुरु प्राप्ती झाल्यानंतर परमात्मा ची ओळख होत असते. संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसह सत्संगला उपस्थित रहावे. आपल्या दैनंदिन जीवनात सुंदर वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला ध्यात्माची गरज असते परंतु घरातील स्त्री ध्यात्मासोबत जुडली तर हि गोष्ट लवकर साध्य होते. आज मनुष्याने सत्संग, सदगुरुला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे."

 

 

कार्यक्रमामध्ये नाटिका, गीत, अभंग याद्वारे सदगुरु चा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक प्रश्नमंजुषाचे आयोजन करून अध्यात्मातील प्रश्नाची उकल करण्यात आली.

 

 

या कार्यक्रमात डॉ. रमेश भोसले (वरिष्ठ प्रोफेसर आणि विभागप्रमुख), डॉ. सविता कांबळे, डॉ. रुची ठाकूर, बी. जे. ससून मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक सहभागी झाले होते. सर्व डॉक्टरांनी स्त्रियांसाठी चांगल्या आरोग्याचे महत्त्व तसेच कुटुंबातील स्त्रियांच्या एकूण आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विचारांचे आदान-प्रदान केले.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन "प.पु.अश्विनी बागल जी" यांनी केले. पुणे झोनचे प्रमुख "प.पु.आ. ताराचंद करमचंदानी जी" यांनी "प.पु. बहन राज जी" (दिल्ली)" यांचे तसेच सर्व साधसंगत चे

आभार व्यक्त केले. 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006