पुणे दि.३ (चेकमेट टाईम्स): निरंकारी सदगुरु माता
सविंदर हरदेव जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने रविवार (दि.१ एप्रिल) रोजी पिंपरी, काळेवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सत्संग भवन चे उदघाटन
संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रमुख 'श्री. ताराचंद करमचंदानी' यांच्या शुभहस्ते संपन्न
झाले. या कार्यक्रमाला पुणे
जिल्ह्याच्या सर्व परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी
ढोल लेझीम पथक, तसेच वेगवेगळ्या प्रांतातील लोककलेचा आधार घेऊन त्याचसोबत
महाराष्ट्रातील विविध संतांच्या वेशभूषा करून भक्ती चा प्रेमपूर्वक संदेश
समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.
उदघाटन
समारंभानंतर याच भवन मध्ये विशाल सत्संग चे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन प्रसंगी बोलताना ताराचंद
जी म्हणाले, "हे सत्संग भवन सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले आहे. याठिकाणी आल्यानंतर सर्व
जण एका निर्गुण निराकार ईश्वराचे भजन-पूजन करतात. तसेच संतांच्या विचारांची
देवाण-घेवाण करून खऱ्या अर्थाने मानवीय गुण आत्मसात करून मानव बनवण्याचे कार्य या
सत्संग भवन मधून होणार आहे. आज समाजामध्ये भक्तीच्या बाबतीत खूप अज्ञान असून ते दूर करण्याचे कार्य सत्संगच्या माध्यमातून होणार आहे."
या उदघाटन
सोहळ्याला समाजाच्या विविध क्षेत्रातून मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. खासदार
श्रीरंग बारणे, नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेविका अनिता पडाळे, मछिंद्र तापकीर, कविचंद भट, विनोद तापकीर, मुरलीधर ढगे आदी मान्यवर तसेच निरंकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीरंग बारणे
आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "समाजाला घडवण्याचे कार्य
केवळ निरंकारी सत्संग च्या माध्यमातून होत आहे, भरकटलेल्या माणसाला दिशा दाखवण्याचे काम आज संत निरंकारी
मिशन करीत आहे. आजच्या धगधगत्या जीवनामध्ये आध्यात्मिक सत्संग हाच एकमेव आत्मशांती चा मार्ग आहे."